India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कर्नाटकात आमदारपुत्राने घेतली ४० लाखांची लाच; घरात सापडले एवढे मोठे घबाड

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचे पुत्र तसेच बंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना चाळीस लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या घटनेने प्रशासनातील भ्रष्टाचार पुढे आला असून कर्नाटकातील भाजप सरकारविरुद्ध विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, या आमदाराच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे घबाडही सापडले आहे.

कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे सरकार सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिले आहे. महाराष्ट्रासोबतही त्यांचा सीमावादावरून संघर्ष झाला होता. त्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण शांत झाले होते. याशिवाय कर्नाटकातही बोम्मई यांच्याविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या सरकारमधील मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यात आता प्रशांत मदल यांच्या लाचखोरीने भर घातली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

यासाठी घेतली लाच
प्रशांत दमल यांनी एका टेंडर प्रक्रियेला क्लिअर करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याचपैकी, ४० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना लोकायुक्तांनी त्यांना रंगेहात अटक केली. या घटनेशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे लोकायुक्तांनी जप्त केली असून चौकशी सुरू आहे.

आमदारपिताही अडचणीत
प्रशांत दमल यांचे वडील तसेच आमदार विरुपक्षप्पा हे कर्नाटक साबण आणि डिटेर्जेंटला लिमिटेड (केएसडीएल) बोर्डचे अध्यक्ष आहेत. या बोर्डला कच्चा मालाचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान दमल यांनी लाच मागितली होती. परिणामत: विरुपक्षप्पा यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक में BJP विधायक के घर से 8 करोड़ रुपए कैश मिला है।

BJP विधायक का बेटा 40 लाख रुपए की रिश्वत लेते रंगे हाथ पकड़ा गया।

सबको पता है… कर्नाटक में BJP की '40% कमीशन' की सरकार चल रही है।

कर्नाटक से उगाही होती है, माल दिल्ली तक पहुंचता है। pic.twitter.com/DGxbWxQkHs

— Congress (@INCIndia) March 3, 2023

कर्नाटकात लोकायुक्तांच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने गुरुवारी मोठी कारवाई केली. येथे भाजप आमदार दमल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला ४० लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. आमदार पुत्र प्रशांत दमल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातून लाच घेताना रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचार शाखेने भाजप आमदाराच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपये आणि त्यांच्या घरातून सुमारे 6 कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकायुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार आली होती. लोकायुक्तांच्या या कारवाईनंतर दमल विरुपक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मदल विरुपक्षप्पा हे दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात 5.73 कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी 1.79 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत लोकायुक्तांची ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. भाजप आमदाराच्या मुलावर केलेली ही कारवाई निवडणुकीचा मुद्दाही बनू शकते, असे बोलले जात आहे.

Cash worth ₹8 crore has been recovered from the house of a BJP MLA in Karnataka.

His son was caught accepting a bribe of ₹40 lakh.

The fact that the BJP govt. in Karnataka operates on a "40% commission" is well-known, & this discovery is just the tip of the iceberg. pic.twitter.com/ObtQDBgz58

— Congress (@INCIndia) March 3, 2023

मुलगा लाच घेताना पकडल्यानंतर भाजपचे आमदार दमल विरुपक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या कुटुंबाविरोधात काहीतरी षडयंत्र रचले जात आहे. माझ्यावर आरोप होत असल्याने नैतिक जबाबदारीखाली मी राजीनामा देत आहे.

Karnataka MLA Son Arrested Corruption 40 Lakh Bribe


Previous Post

पत्नीला लागले स्मार्टफोनचे व्यसन.. पती रागावला… मग, पत्नीने हे केले… वाचून तुम्ही व्हाल थक्क!

Next Post

पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post

पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group