इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून राज्यात गदारोळही सुरू झाला आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे. त्याच वेळी, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानाबाहेरही असेच पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे.
काँग्रेस आमदारांची सायंकाळपासून बैठक सुरु झाली. ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, आमदारांचे मत घेण्याची प्रक्रिया आज रात्रीच पूर्ण केली जाईल. रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटल्याप्रमाणे, सिद्धरामय्या यांनी एक ठराव मांडला. त्याला डीके शिवकुमार आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
सिद्धरामय्या यांनी मांडला हा ठराव
कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा (CLP) नवा नेता नियुक्त करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना अधिकार देण्यात आले आहे. तसा एक ओळीचा ठराव मांडला आणि काँग्रेसच्या १३५ आमदारांनी त्यांच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी खर्गे यांना या प्रस्तावाची माहिती दिली. त्यानंतर खर्गे यांनी के.सी. वेणुगोपाल यांना निर्देश दिले की, तीन वरिष्ठ निरीक्षकांनी प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत घेऊन ते हायकमांडपर्यंत पोहोचवावे.
https://twitter.com/rssurjewala/status/1657795507400351745?s=20
Karnataka Congress CM Name MLA Meet Decision