India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कर्नाटक विधानसभा निवडणूक : काँग्रेसला खणखणीत बहुमत, कर्नाटकच्या जनतेने भाजपला नाकारले; अशी आहे निकालाची ताजी आकडेवारी

India Darpan by India Darpan
May 13, 2023
in मुख्य बातमी
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत काँग्रेसला १३० पेक्षा अधिक जागी विजय मिळाला आहे. भाजपचे पानिपत झाले आहे. भाजपला जेमतेम ६५ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण फौज भाजपने येथे उतरविली तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही कर्नाटक पिंजून काढला होता.

निकालाची ताजी आकडेवारी अशी
एकूण जागा – २२४  बहुमतासाठी आवश्यक – ११३
भाजप…५ (६० विजयी) एकूण ६५
काँग्रेस…१० (१२६ विजयी) एकूण १३६
जेडीएस… १९ विजयी
इतर…२

तुलनात्मक तक्ता
पक्ष…आघाडीवर… विजयी…एकूण…२०१८चा निकाल
भाजप…५…६०…६५ (-३९)……१०४
काँग्रेस…१०…१२६…१३६ (+५५)…८१
जेडीएस…००…१९…१९ (-१८)…३७
इतर…१…०…१ (-२) …३

एक्झिट पोलचा दावा
कर्नाटकात पुन्हा एकदा त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत दाखवण्यात आले आहे. सध्या पाच एक्झिट पोल आहेत ज्यात काँग्रेसला बहुमत मिळेल असे दाखवण्यात आले आहे. यासोबतच भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याची आशा दोन एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. बाकी, भाजप-काँग्रेसच्या आसपास एकही पक्ष दिसत नाही. मात्र, जेडीएस पुन्हा एकदा किंगमेकर बनू शकतो, असा दावा केला जात आहे.

प्रतिष्ठेची निवडणूक
कर्नाटकात यावेळी मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) देखील निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहे. ‘आप’, सपा, बसपा, राष्ट्रवादीसह अनेक छोटे पक्षही रिंगणात आहेत. अनेक अपक्ष उमेदवारांनीही आपले दावे मांडले आहेत. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आदींची मोठी फौज मैदानात उतरवली होती. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी


२६१५ उमेदवारांचे भवितव्य
विधानसभेच्या २२४ जागांसाठी एकूण २६१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये ९०१ अपक्ष आहेत. भाजपने सर्व २२४ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर काँग्रेसने २२१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जेडीएसचे २०८, आम आदमी पार्टीचे २०८, बसपचे १२७ उमेदवार रिंगणात आहेत. समाजवादी पक्षाने १४, राष्ट्रवादीने ९ उमेदवार उभे केले आहेत. इतर राजकीय पक्षांचे ६६९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

२०१८चा निकाल
यापूर्वी २०१८ च्या कर्नाटक निवडणुकीत २२४ जागांच्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. १०४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या खात्यात ८० जागा आल्या. जेडीएसचे ३७ उमेदवार विजयी झाले होते.

Karnataka Assembly Election Results


Previous Post

आजपासून सुरू होणार “शासन आपल्या दारी” हे अभियान… तुम्हाला घरपोच मिळणार या सुविधा

Next Post

‘मन की बात’ ऐकले नाही म्हणून विद्यार्थिनींवर झाली ही कारवाई

Next Post

‘मन की बात’ ऐकले नाही म्हणून विद्यार्थिनींवर झाली ही कारवाई

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group