कळवण :- रोटरी क्लब ऑफ कळवण यांच्याद्वारे नेशन बिल्डर अवार्ड- २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन कळवणच्या हरी ओम लॉन्स येथे करण्यात आले. या प्रसंगी श्री. गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पदमश्री श्रीमती. निलिमा मिश्रा यांच्या हस्ते “जीवन गौरव पुरस्कार- २०२१ प्रदान करण्यात आला. डॉ. जे. डी. पवार यांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेली भरीव कामगिरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल उभारून परिसरातील विद्यार्थ्यांची होणारी शिक्षणाची गैरसोय दूर केली त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने रोटरीने सन्मानित केले आहे.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना डॉ. जे. डी. पवार यांनी आपण अनंत अडचणींवर मात करून कठोर परिश्रम, शिस्त व दूरदृष्टी यांच्या जोरावर शिक्षण संस्था उभारून कळवण सारख्या अतिदुर्गम भागात जे शैक्षणिक संकुल उभारले त्याचे महत्व ओळखून रोटरी क्लबने जो गौरव केला त्यांमुळे निश्चितच समाधान झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी रोटे. निलेश भामरे. रोटे. संभाजी पवार. रोटे विलास शिरोरे, रोटे. जितेंद्र कापडणे, रोटे. डॉ. भामरे कळवण पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी हेमंत कुमार बच्छाव व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.