India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काळाराम मंदिरात संयोगिताराजे यांच्याशी झालेल्या प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

India Darpan by India Darpan
April 2, 2023
in राज्य
0

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजाच्या वंशज संयोगिताराजे यांच्याबाबत नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात भेदभाव केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत खुद्द संयोगिताराजे यांनी या प्रकाराला वाचा फोडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या काळाराम मंदिरातील त्यांच्या पूजेसाठी वेदोक्त मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना त्या महंतांनी ठाम विरोध केला. आता या प्रकरणात प्रथमच संयोगिताराजे यांचे पती तथा छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य करीत प्रतिक्रिया दिली असून संयोगिताराजे यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी राज्यपालांसह अनेक राजकीय नेत्यांनी इतिहासातील महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठी खळबळ माजली होती, आता पुन्हा एकदा नाशकात पुराण ग्रंथ आणि इतिहासातील जुने वाद नव्याने वेगळेच रूप घेऊन पेटलेले दिसून येतात. याला कारण म्हणजे श्री काळाराम मंदिरातील नुकतीच घडलेली घटना होय.

संयोगिताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर खात्यावर एक पोस्ट लिहीत नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला, असा आरोप केला होता. काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला.

अखेर मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. पण तरीही मी महामृत्युंजय मंत्राचा जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, सुमारे १०० वर्षांत ही मानसिकता का बदलली नाही?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
यावर सदर महंत वेदोक्त मंत्रांचा त्यांना कसा अधिकार नाही ते सांगू लागले. यावर आम्ही परमेश्वराची लेकरे असून त्याची स्तुती करायला त्याला भेटायला तुमच्यासारख्या मध्यस्थीची गरज नसल्याचे सांगत त्यानी त्या महंतांना चांगलेच सुनावले. त्यानंतर हे प्रकरण आता चांगलेच पेटले असून या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त्यातच कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजी राजे यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

यावेळी संभाजी राजे म्हणाले की महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे राज्य आहे. तरीही या महाराष्ट्रात अशी कृत्ये करणारे लोक का निर्माण होतात ते कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी जसा त्रास शाहू महाराज आणि इतर महापुरुषांना झाला, अगदी तसाच प्रकार पुन्हा घडू लागला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच संयोगिताराजे या नेहमी सत्याची बाजू घेऊन बोलतात. तसेच जे पटले नाही, ते परखडपणे सांगतात.

नाशिकमध्ये त्यांना जो काही वाईट अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया देखील संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित महंतांनी दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सोशल मिडियातून याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त होतच आहेत.

Kalaram Temple Chhatrapati Sambhaji Raje


Previous Post

नागपूर महापालिकेने साकारले ई ग्रंथालय… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post

तब्बल ११९ बोगस कंपन्यांची निर्मिती… जीएसटी विभागाची मोठी कारवाई… थेट जयपूरहून एकाला अटक

Next Post
प्रातिनिधिक फोटो

तब्बल ११९ बोगस कंपन्यांची निर्मिती... जीएसटी विभागाची मोठी कारवाई... थेट जयपूरहून एकाला अटक

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group