इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नर्सरीचा वर्ग, शिक्षिका आणि चिमुकली
नर्सरीच्या वर्गात शिक्षिका लहान मुलांशी गप्पा मारत असतात.
तेवढ्यात त्या एक प्रश्न विचारतात
मुलांनो मला सांगा बरं, देव कुठे आहे?
एक मुलगी हात वर करते. आणि म्हणते मला माहित आहे.
शिक्षिका – बरं सांग.
मुलगी – आमच्या बाथरूममध्ये.
शिक्षिक क्षणभर गप्प होते आणि विचार करते!
आणि सावध होऊन ती म्हणते – तुला कसं माहित?
मुलगी – रोज सकाळी वडील उठतात,
बाथरुमच्या दारावर टकटक करतात.
त्यानंतर ते जोरदार ओरडतात
अरे देवा, तू अजून आत आहेस!!!
– हसमुख