इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेवणाचे आमंत्रण
(चिंगी आणि झांबरे काका यांचा संवाद)
चिंगी – झांबरे काका, आज आईने
तुम्हाला जेवायला बोलावलं आहे
झांबरे काका – अरे व्वा. आज कशी काय
आठवण झाली माझी. काय म्हटले तुला घरचे.
चिंगी – आई म्हणाली की,
श्राद्धाला कावळे मिळत नाही
म्हणून झांबरे काकांनाच बोलवून आण.
असेही ते गावभर भटकत असतात.
– हसमुख