इंडिया दर्पण – हास्य षटकार – म्हणून बंटी शाळेत उशीरा येतो
(शाळेत इंग्रजीचा वर्ग सुरू असतो. वर्गशिक्षक असलेले मुळे मास्तर शिकवित असतात)
मुळे मास्तर – बंटी बेटा, तू रोज
शाळेत उशीरा का येतोस
बंटी – काही नाही मास्तर. सकाळी उठायला
उशीर होतो म्हणून
मुळे मास्तर – हो का बेटा, रात्री उशीरापर्यंत
अभ्यास करतोस का
बंटी – नाही मास्तर
मुळे मास्तर – मग, काय कारण आहे
बंटी – माझे बाबा म्हणतात, माणसाने
नेहमी मोठी स्वप्ने पहावीत.
स्वप्न मोठी असतात ना.
त्यामुळे ती बघण्यात जास्त वेळ जातो.
म्हणूनच शाळेत यायला उशीर होतो.
– हसमुख