इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘टाईम इज मनी’, असे म्हटले जाते. म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, त्यासाठी काळ-काम-वेग यांची गणिते योग्य व्हावीत म्हणून आपण नेहमीच घड्याळाकडे लक्ष ठेवून असतो. आजच्या काळात मोबाईल मध्येच घड्याळ आल्याने जुन्या घड्याळांचे महत्त्व कमी झाले आहे, परंतु आता पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या स्मार्ट वॉच या घड्याळाची क्रेझ निर्माण झाली आहे. आपण जर भारी म्हणजे जास्त किंमतीची 10 हजारापर्यंतची नवीन स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या देशातील आणि जगातील नामांकित टेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत. यापैकीच अशा 3 स्मार्टवॉचबद्दल जाणून घेणार आहोत, त्या फिचर्समध्ये सर्वात पॉवरफुल आहेत. तसेच फिटनेस तसेच दैनंदिन कामात खूप उपयुक्त आहेत.
Realme Watch S
या स्मार्ट वॉचच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर, या घड्याळात 1.3-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, त्याचे रिझोल्यूशन 360 x 360 पिक्सेल आहे. तसेच या घड्याळाची परिमाणे 259.5 मिमी, 47.0 मिमी आणि 12 मिमी आहेत. यात अॅल्युमिनियम बॉडी व सिलिकॉनचा पट्टा आहे. तसेच यात कॉर्निंग गोरिला ग्लास, वॉटर प्रूफ, कॉल रिसिव्हिंग क्षमता, फिटनेस ट्रॅकिंग देण्यात आले आहे. या घड्याळात 390 mAh बॅटरी आहे जी एका चार्जवर 15 दिवस टिकते. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर आणि अन्य 16 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचद्वारे स्मार्टफोनचे नोटिफिकेशन पाहू शकता, आणि संगीत नियंत्रित करू शकता. Realme Watch S ची किंमत सुमारे 4,999 रुपयांपासून पुढे आहे.
Mi Watch Revolve Active
या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, त्याचे रिझोल्यूशन 348×442 पिक्सेल आहे. यात VO2 मॅक्स सेन्सर, SpO2 सेन्सर, GPS, स्लीप मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर आणि इतर वैशिष्ट्ये एकत्रित केली आहेत. यात 420 mAh बॅटरी असून एका चार्जवर 14 दिवस टिकू शकते. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 117 फिटनेस मोड मिळतात. Mi Watch Revolve Active ची किंमत 9999 रुपये आहे.
Amazfit GTR 2e
या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Amazfit GTR 2e मध्ये 454×454 पिक्सेलसह 1.39-इंचाचा गोल AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये नेहमी ऑन फंक्शनॅलिटी सपोर्ट देण्यात आला आहे. या डिस्प्ले पॅनलमध्ये अँटी फिंगरप्रिंट व्हॅक्यूम कोटिंगसह टेम्पर्ड ग्लास आहे. त्याचे वजन 32 ग्रॅम आहे. बॅटरी बॅकअपमध्ये Amazfit GTR 2e मध्ये 471 mAh बॅटरी असून ती 24 दिवस टिकते. यात ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये स्लीप ट्रॅकिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंग आणि व्हॉईस टॉकिंग असिस्टंटसह PAI स्कोर कॅल्क्युलेटर देण्यात आला आहे. तसेच या घड्याळात 90 स्पोर्ट्स मोड आणि 50 वॉच फेस आहेत. हे घड्याळ आपल्या तणावाची पातळी आणि हृदयाच्या गतीवर सतत लक्ष ठेवते. याची किंमत 9,999 रुपये आहे.