India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ बेबी पावडरचा परवाना अखेर रद्द

India Darpan by India Darpan
September 17, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर आरोग्यासाठी घातक असल्याच्या बातम्या गेल्या अनेक महिन्यांपासून समोर येत आहेत. या माहितीत तथ्य असल्याचे निदर्शनास आल्याने या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. उत्पादनाच्या पद्धतीत दोष असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईमधील मुलुंडस्थित जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील या पावडरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये काही धोकादायक पदार्थ आढळल्याने हा परवाना रद्द करण्यात आला आहे. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. याचा नवजात बालकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द केला आहे.

या पावडरच्या वापराने नवजात शिशु आणि लहान मुलांच्या त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असल्याने बेबी पावडरचे उत्पादन सुरू ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे संस्थेच्या मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

या देशात दोन वर्षांपासून बंदी
अमेरिका आणि कॅनडामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर दोन वर्षांपासून बंदी आहे. या पावडरमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे कंपनी विरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी विरोधात ४० हजारहून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवर बंदी घालण्यात आली. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये ‘एस्बेस्टस’ नावाचा घटक असल्याचा आरोप असून हा पदार्थ कॅन्सर रोगास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कंपनीविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते.

हे महत्त्वाचे
पीएच मूल्य हे पदार्थाच्या आंबटपणा आणि क्षारतेचे मोजमाप आहे. हे pH स्केल किंवा pH बारवर मोजले जाते. जेथे ० अम्लीय आणि १४ अल्कधर्मी दर्शवितो. बाळाची त्वचा प्रौढांच्या त्वचेपेक्षा नाजूक असते. नवजात मुलांच्या त्वचेचा पीएच किंचित जास्त असतो. त्यामुळे ५.५ pH मूल्यापेक्षा जास्त pH मूल्य बाळाच्या संवेदनशील त्वचेला गंभीर नुकसान करू शकते.

Maharashtra Food & Drugs Administration has cancelled the manufacturing license of Johnson’s Baby Powder of Johnson’s & Johnson’s Pvt. Ltd., Mulund, Mumbai after samples of the powder drawn at Pune & Nashik were declared "Not of Standard Quality" by the govt pic.twitter.com/4iFIdNd9RI

— ANI (@ANI) September 16, 2022

Johnson & Johnson’s Baby Powder License Cancels FDA


Previous Post

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक ज्योतिर्लिंगाची झीज; पुरातत्व विभागाचे पथक दाखल होणार

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘स्थगिती’ निर्णयाचा उद्योग क्षेत्राला जबर फटका

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या 'स्थगिती' निर्णयाचा उद्योग क्षेत्राला जबर फटका

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group