नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान बाळांसाठी सर्वोत्तम उत्पादने वापरली जावीत असा सगळयांचाच कटाक्ष असतो. त्यामुळे बाजारपेठेत गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीचीच उत्पादनं घेण्यास प्राधान्य दिले जाते. याच निकषांवर लहान बाळांसाठीच्या उत्पादनांमध्ये जगप्रसिद्ध झालेला ब्रँड म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन या ब्रँडचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या बेबी पावडरमध्ये आरोग्याला अत्यंत घातक घटक असल्याचे उघड झाल्याने कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कंपनीच्या भागधारकांनी एकत्र येऊन या पावडरच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. भागधारकांच्या वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जॉनसन अँड जॉनसन कंपने बेबीनी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये कंपनी जॉनसन अँड जॉनसन बेबी पावडरचं उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील विक्री बंद करणार आहे. अनेक महिला आणि लहान मुलं बेबी पावडरचा वापर करतात. जॉनसन अँड जॉनसन बेबी पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे, असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात अनेक खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जॉनसन अँड जॉनसन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. यामुळे आरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी टॅल्क म्हणजेच बेबी पावडर जगभरात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही काळापासून या पावडरच्या शुद्धतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील औषध नियंत्रण यंत्रणेने केलेल्या तपासणीत जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या नमुन्यात कार्सिनोजेनिक क्रायसोटाइल फायबर्स आढळले. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीवर, या उत्पादनामुळे महिला आणि मुलांना कर्करोग झाल्याचा दावा करणारे 34 हजारांपेक्षा अधिक खटले चालू आहेत. कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.
जॉनसन अँड जॉनसन बेबी पावडरवरील आरोपांमुळे या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे. जागतिक स्तरावर व्यसायाचा विचार करता कंपनीने सन 2023 पर्यंत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पोर्टफोलिओ मुल्यांकनानंतर हा निर्णय घेतला आहे. यामध्ये भौगोलिक प्रदेश, उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला जातो. जॉनसन अँड जॉनसन कंपनीवर 2020 मध्ये बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला.
कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचं उत्पादन हटवले आहे. अमेरिकन न्यायालयात जॉनसन अँड जॉनसन कंपनीविरोधात 22 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये न्यायालयाने कंपनीविरोधात निकाल देत जॉनसन अँड जॉनसन कंपनीला दंड ठोठावला होता. यामध्ये कंपनीला 200 कोटी डॉलरचा दंड द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे या कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात खूप आधीपासूनच बंद केली आहे.
Johnson and Johnson Baby Powder Production Sale Stop