शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना !.. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितीत केले हे प्रश्न

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 30, 2024 | 11:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Jitendra Awhad

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना ! असा प्रश्न करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.
आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सांगितले आहे की, ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती. साधे गणित आहे – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4 परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत.
इतकेच नाही, तर 65.02% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?
आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे!

हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे कि मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा. मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात: मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? ECI चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का? दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे: 13 लाख अतिरिक्त मते का आहेत?, महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का?
लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर ECI ने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना !

ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती.
साधे गणित आहे – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4

परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त…

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 30, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करा…आमदारांसह सातपूर मंडलाचे शहराध्यक्षांना पत्र

Next Post

या व्यक्तींच्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल, जाणून घ्या, रविवार, १ डिसेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल, जाणून घ्या, रविवार, १ डिसेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011