पुणे – रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने अलीकडेच त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. त्यातच जिओचे रिचार्ज प्लॅन तर सुमारे 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. त्याच वेळी, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे रिचार्ज देखील 25 टक्के महाग झाले आहेत.
सहाजिकच मोबाइल, वापरकर्त्यांच्या रिचार्जवरील खर्चात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र तरीही रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने , Airtel आणि Voda-Idea चे काही रिचार्ज प्लॅन अजूनही परवडणारे आहेत.
या प्लॅन्सचे रिचार्ज केले तर आपली बऱ्यापैकी बचत होऊ शकते. या प्लॅन्समध्ये मासिक खर्च 150 रुपयांपेक्षा कमी असेल, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन काय आहेत ? आणि त्यामध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत ? हे जाणून घ्या…
जिओ
रिलायन्स जिओचा एक प्लॅन 1559 रुपयांचा आहे. ही योजना 336 दिवस म्हणजेच 11 महिने चालते. या प्लॅनमध्ये महिन्याची किंमत 141.7 रुपये आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये 24GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
एअरटेल
एअरटेलचा 1799 रुपयांचा अमर्यादित प्लॅन आहे. एअरटेलचा हा प्लॅन 365 दिवस म्हणजे एक वर्ष चालतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एका महिन्याची किंमत 149 रुपये आहे. प्लॅनमध्ये 24GB डेटा देण्यात आला आहे. एअरटेलच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Voda-Idea
या प्लॅनमध्ये 1799 रुपयांची अमर्यादित योजना देखील आहे. या प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, Vi Movies & TV Basic मध्ये प्रवेश उपलब्ध आहे.
BSNL
सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणजेच बीएसएनएलचा 1499 रुपयांचा प्लान आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये महिन्याची किंमत 124 रुपयांच्या जवळपास आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 24GB डेटा देण्यात आला आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.