मुंबई – मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे वाहन उद्योगात खूप मोठा बदल झाले आहेत. परंतु यावर्षी भारतीय बाजारात एकापेक्षा अधिक स्पोर्ट्स युटिलिटी वाहन बाजारात येण्यास तयार झाले आहेत. विशेषतः एसयूव्ही वाहनांची मागणी गेल्या काही महिन्यात झपाट्याने वाढली आहे. बीएमडब्लु iX इलेक्ट्रिक एसयुव्ही भारतात लॉन्च झाली असून किंमत व वैशिष्ट्ये जाणून घेऊ या…
१) BMW iX SUV ही कार अधिकृतपणे भारतात 1.16 कोटी ची (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली आहे. आता तिची बुकिंग देशातील सर्व BMW डीलरशिपवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उघडण्यात आली.
२) BMW ही इलेक्ट्रिक SUV आहे आणि मर्सिडीज EQC, Jaguar I-Pace आणि Audi e-tron यांच्याशी स्पर्धा देईल.
३) BMW iX ही xDrive 40 -326hp पॉवर आणि 630Nm पीक टॉर्क बनवते. xDrive 6.1sec मध्ये वेग वाढवते आणि 200kph चा टॉप स्पीड आहे.
४) xDrive 40 मध्ये प्रत्येक एक्सलवर एक मोटर असलेली ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेट-अप मिळते, त्यामुळे तिला ऑल-व्हील ड्राइव्ह देखील मिळते.
५) BMW IX कारसाठीची बुकिंग आधीच सुरू झाली आहे, मात्र डिलिव्हरी एप्रिल 2022 पासून सुरू होईल. IX हे भारतातील BMW ने वचन दिलेल्या तीन पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांपैकी पहिले असणार आहे.
६) BMW वॉलबॉक्स चार्जर आणि वॉल-सॉकेट चार्जिंग केबल प्रत्येक खरेदीदाराला वाहनासोबत मोफत मिळतील. याव्यतिरिक्त, BMW म्हणते की जलद चार्जिंग युनिट्स देशातील 35 शहरांमध्ये त्याच्या डीलर नेटवर्कवर उपलब्ध असतील.