मुंबई – भारतात कच्चे इंधन म्हणजेच पट्रोलच्या किमती वाढत असताना जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये आहे आणि सर्वात महाग हाँगकाँगमध्ये आहे. हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 195.11 रुपये आणि व्हेनेझुएलामध्ये 1.88 रुपये असे आहे. जगात असे 5 देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 25 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र जगभरात पेट्रोलची सरासरी किंमत 90.83 भारतीय रुपये प्रति लीटर आहे.
एका वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, पेट्रोलसाठी वेगवेगळे कर आणि सबसिडीमुळे वेगवेगळ्या देशांतील किमतीतील फरक पडलेला दिसत आहे. भारतातील पेट्रोलचे दर आता काही शहरांमध्ये सुमारे 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या दरानुसार, एक लिटर पेट्रोलची किंमत 62.36 रुपये आहे. श्रीलंकेत पेट्रोलचा दर आता 68.44 रुपये प्रति लिटर झाला आहे. नेपाळमध्ये आता ते 85.09 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
या 10 देशांमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल
1) व्हेनेझुएलामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 1.88 रुपये झाली आहे. येथे सर्वात स्वस्त पेट्रोल आहे.
2) जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत इराणचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोल 3.86 रुपये झाले आहे.
3) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीरियामध्ये पेट्रोलची किंमत 16.22 रुपयांवर पोहोचली आहे.
4) अंगोलामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत आता 21.37 रुपये आहे.
5) अल्जेरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 24.88 रुपयांपर्यंत आहे.
6) कुवेतमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत आता 26.15 रुपये आहे.
7) नायजेरिया आता येथे एक लिटर पेट्रोल 30.44 रुपये प्रति लिटरने मिळत आहे.
8) स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये तुर्कमेनिस्तानात आता 32.36 रुपयांवर आहे.
9) कझाकिस्तान येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 34.07 रुपये आहे.
10) मलेशियात पेट्रोलचा दर 36.30 रुपये होता, तो आता 36.51 रुपये आहे.