नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या गोंदे औद्योगिक क्षेत्रातील जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीत भीषण अग्नितांडव सुरू आहे. या दुर्घटनाग्रस्त कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी तेथील परिस्थिती आणि बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाधरन, पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. जखमींशीही मी संवाद साधला आहे. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार आहे. बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत शासनातर्फे केली जाणार आहे. तसेच, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1609523533193039874?s=20&t=3HjKvlKdkJU_eNQHKNMCHQ
Jindal Company Fire Accident News Update 6
Chief Minister Eknath Shinde Visit Announcement