India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जाणार

India Darpan by India Darpan
January 1, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जातील असा अंदाज एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्याचे दर २१०० डॉलर्स प्रति औंस होण्याची शक्यता आहे. ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी ४८,०००-५०,००० प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला त्यांनी गुंतवणूदारांना दिला.

गतवर्षी कमोडिटीतील मोठ्या वाढींसाठी तसेच घसरणींसाठी डॉलर केंद्रस्थानी राहिला आहे. डॉलरची ताकद व कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध हा गेल्या अनेक दशकांपासून नियम झाल्यासारखा आहे. अर्थात, दोन वर्षे सलग भक्कम राहिलेल्या अमेरिकी डॉलर निर्देशांकात (डीएक्सवाय), प्रत्यक्ष व अपेक्षित दर फरक सातत्याने वाढत असूनही, नुकतीच तीव्र घसरण झाली आहे. २०२३ मध्ये डॉलर घसरतच राहिला, तर कमकुवत डॉलर व वाढत्या कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध आपल्याला दिसून येईल आणि सोने व चांदी या सहसंबंधांचे सर्वांत मोठे लाभार्थी ठरतील असे मत श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

एकंदर, २०२२ हे वर्ष रोलर कोस्टर राइडसारखे ठरले, नेमके काय होणार आहे याबद्दल आपल्यापैकी कोणालाच अंदाज बांधता आला नाही. मात्र, २०२३ मध्ये, प्रमुख बाजारांमध्ये मंदीची शक्यता असल्यामुळे २०२२ मधील इक्विटी व कॉर्पोरेट रोख्यांची निकृष्ट कामगिरी पुढे तशीच सुरू राहील अशी शक्यता आहे. याउलट सोने संरक्षण पुरवू शकते, कारण मंदीच्या काळात सोन्याची कामगिरी चांगली होते, गेल्या सातपैकी पाच मंदींच्या काळात सोन्याची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. म्हणूनच, २०२३ मध्ये सोने दोनअंकी मोबदला मिळवून देईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.

Finance Gold Rates Investment Hike
Economics


Previous Post

जिंदाल कंपनी अग्रितांडव अपडेट ६ – मुख्यमंत्र्यांनी केल्या या दोन मोठ्या घोषणा

Next Post

जिंदाल कंपनी अग्नितांडव अपडेट ७ – मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमी कामगारांची भेट

Next Post

जिंदाल कंपनी अग्नितांडव अपडेट ७ - मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमी कामगारांची भेट

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group