India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मविआमध्ये फूट… काँग्रेसने दिली भाजप-शिवसेनेला साथ…. खडसेंना जबर धक्का… जळगावात असे घडले नाट्य

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत आज अत्यंत नाटकीय घडामोडीनंतर संजय पवार हे विजयी झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाल्यामुळे खडसे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची खंत एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे.

आज सकाळी जिल्हा बँक चेअरमन पदासाठी राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी रवींद्र भैया पाटीलच विजय होणार असे माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु थोड्याच वेळानंतर राजकीय गणित बदलायला लागली आणि संजय पवार हे विजयी झाले.

रवींद्र भैय्या यांना दहा तर संजय पवार यांना ११ मते मिळाली. या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने खेळी खेळत संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. दरम्यान संजय पवार यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीलाच नव्हे तर पर्यायी खडसे गटाला पुन्हा एकदा जबरदस्त देण्यात आमदार मंगेश चव्हाण यशस्वी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने संजय पवार हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्ष झाले आहेत. संजय पवार हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले आहेत.

Jalgaon District Bank Election Politics Eknath Khadse


Previous Post

विमानाने उड्डाण केले.. १० मिनिटांनंतर अचानक बिघाड झाला… तातडीने इमर्जन्सी लँडिंग केले

Next Post

आळंदी व पंढरपूरला जोडणारा असा असेल पालखी मार्ग… गडकरींनी केली हवाई पाहणी… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

आळंदी व पंढरपूरला जोडणारा असा असेल पालखी मार्ग... गडकरींनी केली हवाई पाहणी... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group