जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत आज अत्यंत नाटकीय घडामोडीनंतर संजय पवार हे विजयी झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाल्यामुळे खडसे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची खंत एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे.
आज सकाळी जिल्हा बँक चेअरमन पदासाठी राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी रवींद्र भैया पाटीलच विजय होणार असे माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु थोड्याच वेळानंतर राजकीय गणित बदलायला लागली आणि संजय पवार हे विजयी झाले.
रवींद्र भैय्या यांना दहा तर संजय पवार यांना ११ मते मिळाली. या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने खेळी खेळत संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. दरम्यान संजय पवार यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीलाच नव्हे तर पर्यायी खडसे गटाला पुन्हा एकदा जबरदस्त देण्यात आमदार मंगेश चव्हाण यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने संजय पवार हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्ष झाले आहेत. संजय पवार हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले आहेत.
Jalgaon District Bank Election Politics Eknath Khadse