शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतापजनक… बलात्कार करुन चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपवला… तीन दिवसांनी असे झाले उघड… जळगाव जिल्हा हादरला…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 11:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थानमध्ये चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह वीट भट्टीत जाळल्याचा प्रकार ताजा असतानाच जिल्ह्यातील अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने या चिमुरडीचा मृतदेह जनावरांच्या गोठ्यात असलेल्या चाऱ्यामध्ये लपवला. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेले घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे.

स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची कामगिरी…
भडगाव पोस्टे हद्दीत पिडीत अल्पवयीन मुली वर अत्याचार करणारा आरोपी ताब्यात… pic.twitter.com/lyqsdzd1ip

— जळगाव पोलीस Jalgaon Police (@JalgaonPolice) August 3, 2023

१ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित स्वप्नील विनोद पाटील याला ३ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. अटक केल्यानंतर संशयिताची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संशयिताला ५० हून अधिक पोलीसांच्या बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणीसाठी गोंडगाव येथे नेत असतांना, संशयिताला आमच्या हवाली करा, म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमाव यांच्यात वाद झाला. त्यानंतर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

गोंडगाव ता.भडगाव येथील एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष कृत्याची व झालेल्या हत्येची वृत मन सुन्न करणारी आहे या अमानवीय घटनेचा जेव्हढा निषेध करावा तेव्हढा कमी आहे. माझी पोलिस अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी तात्काळ घटनेचा तपास करून आरोपींला अटक करून त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा pic.twitter.com/hOab9ipwph

— Unmesh Patil (@UnmeshBPatil) August 3, 2023

गोठ्यात दुर्गंधी येऊ लागल्याने घटना उघडकीस
संशयिताने मुलीवर लैगिंक अत्याचार करुन मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला. दोन दिवसांनंतर गोठ्यात दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निलला अटक केली. याप्रकरणाचा तपास भडगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन तिचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.…

— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2023

jalgaon crime minor girl rape murder bhadgaon
Gondgaon Rural District Posco Sexual Abuse

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक सिटीबस सेवा पुन्हा ठप्प… विद्यार्थ्यांसह नाशिककरांचे प्रचंड हाल…

Next Post

राज्यातील इतक्या धरणांमधून सुरू आहे विसर्ग

Next Post
संग्रहित फोटो

राज्यातील इतक्या धरणांमधून सुरू आहे विसर्ग

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011