सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला म्हणाले…

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 10:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
adar poonawala

पुणे – जगभरात कोरोनाच्या महामारीचा प्रभाव काहीसा कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे भारतासह अनेक देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लशींचे दोन डोस घेतल्यानंतर कदाचित आता आणखी नवीन लशीचे डोस घ्यावे लागतील, शिवाय बूस्टर डोस देखील देण्यात येतील, यासाठी आम्ही संशोधन करत आहोत, असे भारतात कोविडशील्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी म्हटले आहे.

अदार पूनावाला म्हणाले की, ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास नवीन कोरोना प्रकारासाठी खास बनवलेली कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच कोविडशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. तसेच आवश्यक असल्यास, ओमिक्रॉन लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे.

तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत, त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, ती बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्याचा घेऊ. तथापि, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ओमिक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लस आवश्यक आहे, आवश्यक नाही.

पूनावाला पुढे म्हणाले की, बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस असून ते त्याच म्हणजे पूर्वीच्या किंमतीत दिले जातील. आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित केले आहेत. त्याचप्रमाणे जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. तथापि, सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.

लगेचच बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे. याबाबत केंद्राच्या कोरोना समितीचे प्रमुख एन.के. अरोरा म्हणाले होते की, भारत आणि युरोप-उत्तर अमेरिकन देशांमध्ये परिस्थिती सारखी नाही. आपल्या लोकसंख्येच्या मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र लस अतिरिक्त संरक्षण प्रदान करत आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेल्या लशी ओमिक्रॉन विरूद्ध काही संरक्षण प्रदान करणार नाहीत, असा कोणताही पुरावा नाही. या उलट गेल्या वर्षभरात नवीन प्रकार दिसू लागले असूनही लशींनी गंभीर आजारांपासून अत्यंत उच्च पातळीचे संरक्षण प्रदान केले आहे, मात्र ओमिक्रॉनने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण त्यात परिवर्तनांची संख्या जास्त असून ती डेल्टा प्रकारापेक्षा खूप जास्त आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महागाईच्या झळा; LPG गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी महागले

Next Post

नाशिक – कापड व्यवसायात शहरातील एका महिलेस सुरतच्या व्यापाऱ्यांकडून गंडा

Next Post
crime diary

नाशिक - कापड व्यवसायात शहरातील एका महिलेस सुरतच्या व्यापाऱ्यांकडून गंडा

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011