नाशिक : कापड व्यवसायात शहरातील एका महिलेस सुरतच्या व्यापाऱ्यांकडून गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खराब मालाची परत फेड न करता भामटे स्विच ऑफ झाल्याने हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहचला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योया, फातिमा आणि अस्लम मलकानी (रा.सुरत, गुजरात) अशी संशयीत ठकबाजाची नावे आहेत. याप्रकरणी जायदा जरीफ खान (रा.गायकवाड हॅाल जवळ ) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान याचे कोकणीपुरा भागात चिश्तीया लेडीज टेलर व ड्रेस मटेरियल दुकान आहे. २८ सप्टेंबर २०१८ ते १ ऑक्टोबर २०१९ दरम्यान खान यानी संशयीता कडून कापड खरेदी केली होती. त्यातील ५० हजार रूपये किमतीची ड्रेस मटेरियल गाठ खराब निघाल्याने त्यानी ती परत केली असता ही घटना घडली. अनेक दिवस उलटूनही संशयीत यानी पैसे देण्यास टाळाटाळ करून आता संपर्क तोडण्याचे हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहचला आहे अधिक तपास एपीआय बिडकर करीत आहेत.