गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इराणच्या फुटबॉल संघातील महिला खेळाडूंची लिंग चाचणी होणार?

जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने केली तक्रार

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
ELXjxPCUwAIHeK7

मुकुंद बाविस्कर, मुंबई
इराणी खेळाडूंची लिंग चाचणी आणि डोप चाचणी घेण्याची विनंती जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) केली आहे. यासंदर्भात महासंघाने एएफसीला तक्रार पत्र पाठवले आहे. त्यामुळे फुटबॉल जगतात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, यापूर्वी देखील असेच प्रकार घडून आले आहेत. त्यामुळे इराण संघाची चाचणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जॉर्डन फुटबॉल असोसिएशनने आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (एएफसी) कडे तक्रार सादर केली आहे, महिला आशिया चषक पात्रता स्पर्धेत जॉर्डन महिला राष्ट्रीय संघाकडून खेळलेल्या इराणच्या खेळाडूंपैकी एकाच्या लिंगाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जॉर्डन फुटबॉल असोसिएशनचे (जेएफए) अध्यक्ष अली बिन अल-हुसेन यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर केले.

जेएफएचे अध्यक्ष अली बिन अल-हुसैन यांनी ट्विटरवर हे पत्र शेअर केलेल्या या पत्रात म्हटले आहे की, “जेएफएने सादर केलेले पुरावे आणि या स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन, आम्ही एएफसीला स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या पॅनेलद्वारे पारदर्शक आणि स्पष्टपणे तपास सुरू करण्याची विनंती करतो, विशेषत: खेळाडूंच्या लिंग आणि डोपिंग चाचण्या तपासण्यासाठी इराणी महिला फुटबॉल संघाने तयार राहावे.

लिंग चाचणीची मागणी का?
अँड्रोजेन नावाचा एक हार्मोन आहे जो पुरुषांमध्ये आढळून येतो. या हार्मोन्समुळे माहिलां छाती ही सपाट असते, आवाज पुरुषी असतो. अँड्रोजेन हा हार्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ या हार्मोनचा एक अंश आहे. अँड्रोजेन हा प्रामुख्याने पुरुषांमध्येच आढळला जातो. पण, त्याचे काही अंश हे महिलांमध्ये सुद्धा सापडत असतात. कोणत्याही महिला खेळाडूला जेव्हा एखाद्या स्पर्धेसाठी पात्र ठरवले जाते, तेव्हा त्या खेळाडूला रक्ताची चाचणी द्यावी लागते. रक्ताची चाचणी करत असतांना महिला खेळाडूंच्या रक्तात ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण किती आहे हेसुद्धा तपासले जाते. कारण या तपासणीत जर ‘टेस्टोस्टेरॉन’चं प्रमाण अधिक आढळले तर त्या खेळाडूची डीएनए तपासणी केली जाते. तसेच महिला खेळाडूंची ‘गायनॅक टेस्ट’, गुप्तांग तपासणी केली जाते. महिला खेळाडूमध्ये पुरुषत्वाचा काही अंश आहे का? हे पाहणे हा सर्व तपासण्यांचा उद्देश असतो

डोपिंग म्हणजे काय?
कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्यात असलेली शारीरिक क्षमता जलदगतीने वाढविण्यासाठी खेळाडूने उत्तेजक द्रव घेतले असेल तर ते तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचणीला डोपिंग चाचणी असे म्हणतात. क्रीडा क्षेत्रात स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग केले जाते. कोणत्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षण शिबिरात परिक्षकांना संशय आल्यास डोपिंग टेस्ट घेतली जाते. ही चाचणी विश्व डोपिंग संस्था आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून घेतली जाते.

महिला संघावर संशय का?
सुमारे ६ वर्षांपूर्वी २०१५मध्ये इराणच्या महिला फुटबॉल संघातील आठ खेळाडू पुरुष असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने क्रीडा जगतात एकच खळबळ माजली होती, यामुळे इराणच्या फुटबॉल नियामक मंडळावर जगभरातून टीकेची झोड उठली होती. इराण फुटबॉल महासंघाचे हे कृत्य अनैतिक असल्याची प्रखर टीका अनेकांनी केली होती.
विशेष म्हणजे महिला संघात पुरुष खेळाडूंची वर्णी लावण्याची इराणची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही २०१० मध्ये इराणच्या संघात चार पुरुष खेळाडू असल्याचे उघड झाले होते. या खेळाडूंना लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला व्हायचे असल्याची सारवासारव मंडळाकडून केली गेली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इराणच्या क्रीडा अधिकार्‍यांनी सर्व संघाची लिंग चाचणी करण्याचे आदेश दिले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुगल फोटोज मध्ये आल्या या नव्या भन्नाट सुविधा

Next Post

तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा आहे? असा करा अर्ज

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा आहे? असा करा अर्ज

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011