सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुगल फोटोज मध्ये आल्या या नव्या भन्नाट सुविधा

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
google photos

पुणे – आजच्या आधुनिक काळात छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी मध्ये अनेक प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. पूर्वीच्या काळी फोटोग्राफी म्हणजे कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र काढले जात असे. परंतु त्यानंतर रंगीत फोटोग्राफीचा जमाना आला. पूर्वी विविध कॅमेऱ्याच्या साह्याने फोटोग्राफी केली जात असे, परंतु आता मोबाईल मधील कॅमेऱ्याने फोटो काढण्यात येतात.

गुगल सारख्या कंपन्यांनी फोटो आणि फोटो एडिटिंग विषयीची विकसित केले आहेत यामध्ये कालानुरूप वेगवेगळे बदल होत आहेत तंत्रज्ञान कंपनी गुगल ने गेल्या वर्षी पिक्सेल स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी फोटोजमध्ये मशिन लर्निंग गुगल फोटोजवर चालणारे एडिटिंग टूल सादर केले होते. आता कंपनीने आयओएस अॅप ( iOS ) वापरकर्त्यांसाठी पोर्ट्रेट लाइट, ब्लर आणि स्मार्ट सजेशनसह अनेक एडीटींग (संपादन ) साधने दिली आहेत. तथापि, ही साधने घेण्यासाठी वापरकर्त्यांना गुगल वनचे सदस्यत्व खरेदी करावे लागेल.

कोणत्या नवीन टूल्सना गुगल फोटोज मध्ये स्थान मिळाले आहे, ते जाणून घेऊ…
पोर्ट्रेट लाइट
हे साधन अॅप वापरकर्त्यांना फोटोंमध्ये कृत्रिम लाईट (प्रकाश ) जोडण्याची परवानगी देते. याशिवाय अॅप वापरकर्ते या टूलद्वारे स्वतःच्या चित्रानुसार ब्राइटनेस सेट करू शकतात. या टूलचा अॅप वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल, असा विश्वास गुगल कंपनीने व्यक्त केला आहे.

ब्लर
या टूलद्वारे अॅप वापरकर्ते त्यांच्या फोटो किंवा चित्राच्या पार्श्वभूमीत अस्पष्टता जोडू शकतात म्हणजे ब्लर करू शकतात, त्यामुळे पुढील चित्र किंवा फोटो अधिक स्पष्ट आणि उठावदार होऊ शकतो.

कलर फोकस
या टूलच्या मदतीने अॅप वापरकर्ते पार्श्वभूमी डिसॅच्युरेट करू शकतात तसेच अग्रभाग रंगीबेरंगी बनवू शकतात. यामुळे चित्रात किंवा फोटोत मेन असलेला विषय स्पष्ट किंवा चकाचकपणे समोर येतो.

स्मार्ट सूचना
स्मार्ट सूचना हे अॅप वापरकर्त्यांना प्रत्येक फोटोच्या तपशिलानुसार एडीट (संपादन ) करण्याचे सुचवते, जेणेकरून वापरकर्ते तो फोटो सहज एडीट करू शकतील आणि त्याला आणखी आकर्षक बनवू शकतील.

एचडीआर
अॅप वापरकर्ते या टूलद्वारे त्यांच्या फोटोंचा ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवू शकतात. यामुळे यूजर्सचे फोटो आणखी आकर्षक होतील, असे गुगल कंपनीचे म्हणणे आहे.

स्काय
 या टूलच्या मदतीने यूजर्स फोटोमधील स्काय(आकाश ) एडिट करू शकतात. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना रंग आणि कॉन्ट्रास्ट छान-ट्यून करण्यासाठी सेटिंग मिळेल, त्यामुळे फोटो उत्कृष्ट होईल.

दरम्यान, गुगलद्वारे ऑफर केलेली सर्व साधने वापरण्यासाठी, वापरकर्त्यांच्या उपकरणांमध्ये किमान 3GB रॅम आणि iOS 14.0 वर असणे आवश्यक आहे. तसेच, वापरकर्त्यांना गुगल वन सदस्यत्व पॅक खरेदी करावा लागेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

इराणच्या फुटबॉल संघातील महिला खेळाडूंची लिंग चाचणी होणार?

Next Post
ELXjxPCUwAIHeK7

इराणच्या फुटबॉल संघातील महिला खेळाडूंची लिंग चाचणी होणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011