India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

CBIची धुरा आता या IPS अधिकाऱ्याच्या हाती… उच्चस्तरीय समितीचा निर्णय… अशी आहे त्यांची कारकीर्द

India Darpan by India Darpan
May 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील मोदी सरकारने प्रवीण सूद यांची सीबीआयच्या नवीन महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. प्रवीण सूद यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. प्रवीण सूद हे यापूर्वी कर्नाटकचे पोलिस महासंचालकही राहिले आहेत. प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीमध्ये पंतप्रधान मोदींशिवाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे.

तिघांमधून निवड
समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडली होती. त्यानंतर ही नावे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवण्यात आली. या समितीने सीबीआयच्या नव्या अध्यक्षांचे नाव निश्चित केले. कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद, डीजी फायर सर्व्हिसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड ताज हसन आणि मध्य प्रदेशचे डीजीपी सुधीर कुमार सक्सेना अशी तीन नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती.

१९८६ च्या बॅचचे अधिकारी
प्रवीण सूद हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्याचे सीबीआय महासंचालक सुबोध कुमार हे मुंबई पोलीस आयुक्त होते आणि ते मुंबई पोलीस आयुक्तातून सीबीआय महासंचालक झाले. सीबीआय महासंचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असला तरी तो पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. प्रवीण सूद अशा वेळी सीबीआय महासंचालक म्हणून पदभार स्वीकारत आहेत जेव्हा एजन्सी अनेक संवेदनशील प्रकरणांची चौकशी करत आहे. यामध्ये पेगासस स्पायवेअर, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा आदी प्रकरणांचा समावेश आहे.

कर्नाटकचे पोलीस महासंचालक आता सीबीआयचे नवे बॉस

IPS प्रवीण सूद सीबीआयचे नवे महासंचालक

महाराष्ट्र केडरचे सुबोधकुमार जैस्वाल यांच्यानंतर सीबीआयचे नवे महासंचालक बनणार प्रवीण सूद

दोन वर्षांसाठी सीबीआय महासंचालक म्हणून नियुक्ती pic.twitter.com/R0FPhns2ZW

— Prashant Kadam (@_prashantkadam) May 14, 2023

IPS Officer Praveen Sood Appointed as a CBI Director


Previous Post

आयपीएल अधिक चुरसपूर्ण… १० पैकी ८ संघांमध्येच थरार.. या संघांवर टांगती तलवार… हे दोन सामने ठरणार निर्णायक

Next Post

नाशिक महापालिकेने या ३ घरांवर चालवला JCB… यापुढेही सुरू राहणार कारवाई (व्हिडिओ)

Next Post

नाशिक महापालिकेने या ३ घरांवर चालवला JCB... यापुढेही सुरू राहणार कारवाई (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group