रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? बघा, तज्ज्ञ काय सांगताय

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 5:12 am
in इतर
0
ipo

आयपीओ: नव्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श साधन

नव्याने गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरलेल्यांसाठी गुंतवणुकीचा प्रवास अनेक कारणांसाठी आव्हानात्मकही ठरू शकतो आणि समाधान देणाराही ठरू शकतो. नव्याने गुंतवणूक करू लागलेल्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकींमध्ये असलेल्या जोखमींचीही जाणीव असते. शेअर बाजाराचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी सुरुवातीला आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा, आयपीओंसारख्या आदर्श गुंतवणूक साधनांचा विचार करणे निर्णायकरित्या महत्त्वाचे आहे. आयपीओंमध्ये पैसे गुंतवताना नवख्या गुंतवणूकदारांनी निष्काळजीपणा करून चालणार नाही हे खरेच, पण माहितीपूर्ण निर्णय केल्यास आयपीओ हे गुंतवणुकीचे साधन बराच नफा मिळवून देऊ शकते. व्यक्तीच्या गुंतवणूक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आयपीओ हा सर्वोत्तम मार्ग का समजला जातो याबद्दल सविस्तर सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी (मिडकॅप्स) अमरजीत मौर्य.

पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे, गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी आयपीओ हा मार्ग नवखे गुंतवणूकदार वापरू शकतात. अर्थात, गुंतवणुकीसाठी आयपीओची निवड करताना माहितीपूर्ण निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. नवीन गुंतवणूकदाराने चांगले कॉर्पोरेट प्रशासन, दीर्घकालीन चित्र आणि कंपनीच्या व्यवस्थापनाचा दर्जा यांचा अभ्यास करून आयपीओची निवड करावी. याशिवाय, काही धोक्याच्या निशाणांचा म्हणजेच कंपनीसंदर्भातील विवाद किंवा कंपनीने अंगिकारलेली आक्रमक लेखापालन प्रक्रिया यांचाही विचार गुंतवणूकविषयक निर्णय करताना झाला पाहिजे.

आयपीओंची संख्या वाढत आहे
चालू वर्षात (२०२१) भारतीय गुंतवणूकदारांपुढे अनेक आयपीओंचे पर्याय आले. यामध्ये स्टार्टअप्स आणि काही प्रस्थापित ब्रॅण्ड्सचाही समावेश होता. आयपीओंची संख्या वाढल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात. हे पर्याय विविध विभाग तसेच भांडवलीकरणानुसार (कॅपिटलायझेशन) असतात. म्हणूनच जोखीम पत्करण्याची तयारी व गुंतवणुकीची उद्दिष्टे यांच्या आधारे गुंतवणूकदार उपलब्ध आयपीओंमधून एकाची किंवा अनेकांची निवड करू शकतो.

लक्षणीय भांडवल अधिमूल्यन प्राप्त करून देणारे
अलीकडील काळात अनेक आयपीओंनी, बम्पर लिस्टिंग्जच्या माध्यमातून नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षणीय भांडवल अधिमूल्यन करून देण्यात, मदत केली आहे. अशा आयपीओंची काही उदाहरणे बघायची तर त्यात अलीकडेच सूचीबद्ध (लिस्टेड) झालेल्या, नायका ईकॉमर्स व्हेंचर्स, (८० टक्के प्रीमियमचा पुरवठा), नाझरा टेक्नोलॉजिज (सुमारे ८० टक्के प्रीमियम) आणि सोना बीएलडब्ल्यू (लिस्टिंगनंतर काही महिन्यांच्या आतच इश्यूच्या तुलनेत ९६ टक्के सरस कामगिरी), या कंपन्यांच्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या भांडवलाचे अधिमूल्यन झाले. आयपीओचा विचार बाजारात प्रवेशासाठीचा उत्तम मार्ग म्हणून करण्यासाठी, ही उदाहरणे नवख्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देतात.

आली समीप घटिका! LICच्या IPOची प्रतीक्षा संपली https://t.co/DlaHF6MIXq

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) November 18, 2021

गुंतवणुकीतील मुद्दल ‘खर्च होण्याची’ शक्यता
गुंतवणूक प्रवासाची सुरुवातच, निष्काळजी व असमान गुंतवणूक प्रक्रियांमुळे मुद्दलच हातातून जाण्यात होणे, नवख्या गुंतवणूकदारांसाठी नवीन नाही. नवखे गुंतवणूकदार मित्रमंडळी, कुटुंबीय आदींचा सल्ला घेतात तसेच यूट्यूब चॅनल्ससारख्या काही अनाहूत सल्लागारांचा सल्लाही मानतात आणि झटपट पैसा कमावण्याच्या नादात मोठी रक्कम गुंतवतात. एफअँडओ तसेच पेनी स्टॉक्समधील गुंतवणुकीत मोठी जोखीम असते व व्यक्तीचे यात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच आयपीओ हा तुलनेने अधिक सुरक्षित पर्याय आहे (वर दिलेल्या पर्यायांच्या तुलनेत), कारण यात संपूर्ण गुंतवणूक हातातून जाण्याची शक्यता कमी आहे.

अपेक्षित नफ्याचे मूल्यमापन
ग्रे मार्केट प्रीमियम किंवा विविध मंचांवर बाजारांविषयी होणारी चर्चा अशा बाजाराच्या स्थितीविषयी माहिती देणाऱ्या विविध मार्गांचा उपयोग करून माहितीपूर्ण निर्णय केला जाऊ शकतो. नवखे गुंतवणूकदार अशा फोरम्सवरील चर्चा नियमित ऐकून, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबतचे आपले ज्ञान व अनुभव समृद्ध करू शकतात. हे फोरम्स (मंच) त्यांना आयपीओशी निगडित योग्य निर्णय करण्यामध्येही मदत करू शकतात.

जोडून घेण्याची संधी
आयपीओ हा कंपनीच्या स्टॉकचा प्रारंभिक प्रस्ताव आहे हे नवख्या गुंतवणूकदारांनी समजून घेतले पाहिजे. हा प्रस्ताव एखाद्या स्टार्टअपने किंवा बाजारातील प्रस्थापित कंपनीने ठेवलेला असू शकतो. म्हणूनच आयपीओ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या आर्थिक प्रगतीशी जोडून घेण्याची संधी देतात. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या अपेक्षित वाढीविषयी बाजारातील निदर्शक सकारात्मक असतील, तर या कंपनीशी जोडून घेण्याचा आयपीओ हा सर्वोत्तम मार्ग आहे.

सारांश:
गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार चिंताग्रस्त, संशयी असतो आणि काही वेळा अतिउत्साहातही असतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास नफा मिळवून देणारा ठरावा यासाठी नवख्या गुंतवणूकदाराने गुंतवणुकीची सर्वोत्तम साधने निवडली पाहिजेत. आयपीओ हा सर्वोत्तम मार्गांपैकी एक असू शकतो. या मार्गाने गुंतवणूकदाराला दीर्घकाळात उत्तम मोबदला मिळू शकतो आणि त्याचा गुंतवणुकीचा प्रवास आशादायी होऊ शकतो. अर्थात मूलभूत संशोधनासाठी त्याने आवश्यक तेवढा वेळ दिला पाहिजे आणि त्यानुसार माहितीपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

BSNLचा स्वस्त प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2GB डेटा

Next Post

लग्नासाठी तरुणांना मिळेना मुली! ४० हजार तमिळ ब्राह्मण तरुणांसाठी झाला हा निर्णय

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

लग्नासाठी तरुणांना मिळेना मुली! ४० हजार तमिळ ब्राह्मण तरुणांसाठी झाला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011