इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचा संघ उद्या रविवारी (८ मे) उद्या वेगळ्या रंगात दिसणार आहे. आरसीबीचा सामना उद्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. या सामन्यात आरसीबीचा संघ संघ लाल आणि काळ्या रंगाच्या जर्सीत नाही तर हिरव्या जर्सीत दिसणार आहे. 2011 आरसीबीचा संघ केवळ एका सामन्यात हिरवी जर्सी घालतो, पण गेल्या वर्षी संघाला असे करता आले नव्हते. मात्र, यावेळी तयारी करण्यात आली असून आरसीबीकडून जर्सीचे लाँचिंगही करण्यात आले आहे.
आरसीबी संघाने हिरवी जर्सी परिधान केली कारण संघाला संपूर्ण जगाला संदेश द्यायचा आहे की तुम्ही कोणत्याही किंमतीत पर्यावरणाचे रक्षण करा आणि जगभरात हिरवळ आणली पाहिजे. पर्यावरण सुरक्षित असेल तर आपण सर्व सुरक्षित राहू. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले, तर अशी वेळ येईल की, पिण्यासाठी पाणी नाही, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही राहणार नाही. अशा परिस्थितीत आनंदी जीवनाची कल्पना करणे निरर्थक ठरेल.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने या हंगामातील ग्रीन जर्सी सामन्यासाठी दोन हॅशटॅग देखील चालवले आहेत. RCB फ्रँचायझीने #GoGreen आणि #ForPlanetEarth ट्रेंडचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी हैदराबादविरुद्ध दुपारी ३.३० वाजता संघ मैदानात उतरेल. त्यानंतर सर्व खेळाडू हिरव्या जर्सीत दिसतील. आरसीबीने या मोसमात 11 पैकी 6 सामने जिंकले असून आता संघाच्या नजरा प्लेऑफसाठी पात्र ठरण्यावर आहेत.