मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) सांताक्रूझ परिसरातील कार्यालयाला आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे ८ बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. ३ ते ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयातील फर्निचर, साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप कळालेले नाही. शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. अद्याप त्यास कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. कार्यालयातील अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आणि कॉम्प्युटर्स मात्र जळून खाक झाले आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले.
या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. pic.twitter.com/QOZxs51oWf— Omkar Wable (@omkarasks) May 7, 2022