India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आयपीएलमधील सातवे आणि सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर विराट कोहली म्हणाला…

India Darpan by India Darpan
May 22, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमधील सातवे आणि सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. त्याने अशा लोकांवर निशाणा साधला आहे जे कोहलीची टी-२० कारकीर्द संपल्याचे अनेक दिवसांपासून वक्तव्य करत आहेत.

भारताचा दिग्गज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने म्हटले आहे की, तो खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. कोहलीचा स्ट्राइक-रेट आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीविरुद्धची फलंदाजी यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, परंतु आता त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शतके ठोकून टीकाकारांना उत्तर दिले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लीग फेरीच्या शेवटच्या सामन्यानंतर एका मुलाखतीत कोहली म्हणाला, “मला खूप बरे वाटले. बर्‍याच लोकांना वाटते की माझी टी20 क्रिकेटमधील कामगिरी घसरत आहे, पण मला असे अजिबात वाटत नाही. मला वाटते की मी माझे सर्वोत्तम टी20 क्रिकेट खेळू शकेन. आणि सध्या खेळत आहे.” आरसीबीच्या गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावा करून संघाला २० षटकांत १९७ धावांपर्यंत मजल मारली.

कोहली म्हणाला, “मी फक्त माझा आनंद घेत आहे. अशा प्रकारे मी टी-20 क्रिकेट खेळतो. मला अजून खुप खेळायचे आहे. खूप चौकार मारायचे आहेत आणि जर परिस्थितीने मला शेवटी मोठे शॉट्स मारण्याची परवानगी दिली तर खुप काही करण्याचा माझा प्रयत्न आहे.” कोहली टी-20 करिअरमध्ये १२ हजार धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या टी20 सह, कोहलीने ३७४ टी20 सामन्यांमध्ये ४१.४० च्या सरासरीने आणि १३३.३५ च्या स्ट्राइक रेटने ११९६५ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे.

𝗨𝗡𝗦𝗧𝗢𝗣𝗣𝗔𝗕𝗟𝗘 🫡

Back to Back Hundreds for Virat Kohli in #TATAIPL 2023 👏🏻👏🏻

Take a bow 🙌 #RCBvGT | @imVkohli pic.twitter.com/p1WVOiGhbO

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023

कोहली म्हणाला, “तुम्हाला परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि जेव्हा परिस्थितीची मागणी असेल, तेव्हा तुम्हाला तेथे तुमचा खेळ वाढवावा लागेल आणि जोखीम घ्यावी लागेल. मी सध्या माझ्या खेळाचा आनंद घेत आहे आणि मी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे. मी चांगली कामगिरी करत आहे आणि चांगले वाटत आहे. .” माझं लक्ष पावसावर लागत नव्हतं. मी फक्त संघासाठी काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करत होतो.”

या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या मोसमात १४ सामन्यात ५३.२५ च्या सरासरीने आणि १३९.८२ च्या स्ट्राईक रेटने ६३९ धावा केल्या. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ५६.१५ च्या सरासरीने आणि १५३.६८ च्या स्ट्राईक रेटने ७३० धावा केल्या. त्याच वेळी, गुजरातचा शुभमन गिल १४ सामन्यांमध्ये ५६.६७ च्या सरासरीने आणि १५२.४६ च्या स्ट्राइक रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. डुप्लेसिस आणि कोहली आता लीगमधून बाहेर पडल्यामुळे शुभमनला ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे.

Innings Break!

Yet another fantastic batting display from @imVkohli powers #RCB to 197/5 in the first innings 🙌

Will it be enough for @gujarat_titans?

Scorecard ▶️ https://t.co/OQXDTMiSpI #TATAIPL | #RCBvGT pic.twitter.com/EXtCasqVT2

— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023

IPL RCB Virat Kohli After Centaury


Previous Post

इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनविले हे स्मार्ट हेल्मेट… त्याची खासियत जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

Next Post

पंतप्रधान मोदींना मिळाला हा सर्वोच्च सन्मान… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये.. जागतिक नेतेपद अधोरेखित

Next Post

पंतप्रधान मोदींना मिळाला हा सर्वोच्च सन्मान... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये.. जागतिक नेतेपद अधोरेखित

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group