बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IPL स्थगितीवरून BCCI मध्ये मतभेद

by India Darpan
मे 5, 2021 | 7:59 am
in राष्ट्रीय
0

विशेष प्रतिनिधी, मुंबई
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यांमध्ये मतभेद होते. एका आठवड्याचा ब्रेक घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करावी, असे मत मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत अनेक पदाधिकार्यांचे होते. परंतु स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगित करावे यावर सचिव जय शाह अडलेले होते. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यावर याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडूनच दुबईमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणे जवळपास निश्चित झाले आहे.
”तुम्ही स्थानिक आठ संघांची स्पर्धा आयोजित करू शकत नाहीयेत, तेव्हा १६ संघांची विश्वचषक स्पर्धा कशी आयोजित करू शकाल,” असा प्रश्न निश्चितच आयसीसी आणि परदेशी क्रिकेट मंडळ उपस्थित करू शकतील. भारतात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही क्रिकेट मंडळ आपले क्रिकेट संघ भारतात पाठविणार नाही. आयपीएल स्थगित करण्याच्या निर्णयामुळे आयसीसीच्या हातात आयते कोलित सापडले आहे. आयसीसीने आधीच युएईचा पर्याय ठेवला होता. जूनमध्ये आयसीसीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
१५ संघ बाहेरून येणार
आयपीएलमध्ये ३० टक्के परदेशी खेळाडू आहेत. पण टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताला सोडून १५ संघ भारताबाहेरून येणार आहेत. त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड काम आहे. आयपीएलमध्ये आठ संघांच्या फ्रँचाइजी भारतीय आहेत. त्या काळात भारतात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्यास इतर देशांचे सरकार क्रिकेट संघांना पाठविण्यास नकार देतील.
संघांच्या सुरक्षेला प्राधान्य
भारतात कोरोनामुळे दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बहुतांश क्रिकेट मंडळ चिंतीत आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी क्रिकेट संघांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल. भारतातील परिस्थिती पाहता कोणताही परदेशी संघ पुढील सहा महिन्यात भारतात येणार नाही, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुबईतच स्पर्धेचे आयोजन करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतात सापडला कोरोनाचा नवा अवतार; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

Next Post

राज्यातील या महाविद्यालय व रुग्णालयांचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत होणार परीक्षण

India Darpan

Next Post
Amit Deshmukh 699x375 1

राज्यातील या महाविद्यालय व रुग्णालयांचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत होणार परीक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011