बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतात सापडला कोरोनाचा नवा अवतार; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

by India Darpan
मे 5, 2021 | 7:54 am
in संमिश्र वार्ता
0
Corona 1

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात कोरोनाची दुसरी लाट वाढत असताना आता विषाणूचे नवीन रूप प्रचंड धोकादायक आणि भयानक असल्याचे सिद्ध होत आहेत. एकीकडे देशातील शास्त्रज्ञ कोरानाच्या डबल व्हेरिएंट बी 1617 चा ब्रेक शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक नवीन प्रकार आढळला असून दहापट अधिक संसर्गजन्य आहे. हैदराबाद आणि गाझियाबादच्या संशोधकांच्या पथकाला हा नवीन प्रकार सापडला असून त्याला ‘ एन 440 के ‘ असे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रकारामुळे कोरोना संसर्गाने देशाच्या अनेक भागात आणखी जोरदार लाट येणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
        देशात करोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना आता दक्षिण भारतात आढळलेल्या करोना विषाणूमुळे चिंतेत भर पडली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत या विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली आहे. हा करोना व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे.  या विषाणूची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचे सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितले असून या विषाणूमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण बाधित होतो.
      त्याचप्रमाणे N44OK हा करोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.618 या व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू रुग्णांना लगेच गंभीर संसर्ग करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ३ ते ४ दिवसातच रुग्णाची स्थिती खालावत असल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही प्रभाव पडत आहे.
      विशेष म्हणजे दक्षिण भारतात आढळून आलेला N44OK हा व्हायरस सर्वत्र पसरत आहे. त्याचे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात B.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.
      आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात हा प्रकार प्रथम सापडला असल्याचे संशोधकांनी सांगितले.  त्याला एपी व्हेरियंट देखील म्हटले जात आहे.  आता हा प्रकार आंध्र आणि तेलंगणासह देशाच्या बर्‍याच भागात वेगाने पसरत आहे.
दुसर्‍या लाटेदरम्यान आंध्र आणि तेलंगणातील सर्व नवीन प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारामुळे घडली आहेत आणि ती सतत वाढत आहे, असा संशोधकांचा दावा आहे.  गेल्या दोन महिन्यांत देशातील निम्म्या पेक्षा जास्त रुग्ण प्रकरणे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांतून समोर आले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवणच्या भूमिपुत्राच्या प्रयत्नातून मिळाले दोन हजार पीपीई किटआणि नावीन्यपूर्ण प्रणाली

Next Post

IPL स्थगितीवरून BCCI मध्ये मतभेद

India Darpan

Next Post

IPL स्थगितीवरून BCCI मध्ये मतभेद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011