बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

IPL गुजरात आणि चेन्नईत आज टश्शन… कुणाचे पारडे जड? हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज काय?

by Gautam Sancheti
मे 23, 2023 | 11:36 am
in मुख्य बातमी
0
FwxrrQkWwAEUAlZ e1684821891767

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी आज होत आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअममध्ये आज सायंकाळी ७.३० वाजता हा सामना होईल. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा एक कुशल रणनीतीकार म्हणून ओळखला जातो पण जेव्हा त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज मंगळवारी चेपॉक स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना करेल तेव्हा त्याला फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला थांबवावे लागेल. त्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील पहिला क्वालिफायर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता होईल.

शुभमनने गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावून विराट कोहलीचा शतकाचा प्रयत्न उधळला होता, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ आयपीएलमधून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा या युवा फलंदाजाकडे असतील. भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीकडे त्याच्यासाठी निश्चितच खास रणनीती असेल.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून ते सर्व जिंकण्यात गुजरातला यश आले आहे. म्हणजेच चेन्नईला गुजरातविरुद्ध पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गुजरातचा कर्णधार हार्दिक चेन्नईचा कर्णधार धोनीला आपला मार्गदर्शक आणि आदर्श मानत आहे. या मोसमातील पहिला सामना सीएसके आणि जीटी यांच्यात खेळला गेला ज्यामध्ये हार्दिक गुरु धोनीने शिष्यांवर मात केली. गुजरात पाच गडी राखून जिंकला.

चेपॉकवर चेन्नईने सात सामने खेळले आहेत परंतु प्रत्येक सामन्यात खेळपट्टीचे स्वरूप बदलले आहे आणि त्यामुळे आगामी सामन्यात ते कसे वागेल हे सांगणे कठीण आहे. गुजरातची फ्रँचायझीही चेन्नईच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जात असल्याने हा सामनाही रंजक बनला आहे. त्याचे मजबूत व्यवस्थापन आणि प्रशासन क्रिकेटशी संबंधित समस्यांमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि बहुतेक निर्णय आशिष नेहरा, गॅरी कर्स्टन आणि विक्रम सोलंकी घेतात. हार्दिक पांड्यामध्ये, गुजरात टायटन्सकडे एक कर्णधार आहे जो धोनीसारखा चांगला रणनीतीकार मानला जातो.

चेन्नईप्रमाणे गुजरात संघालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसे बदल करण्यात रस नाही, एक-दोन सामने खराब झाले तरी. अशा परिस्थितीत, हा सामना समान रणनीती असलेल्या संघांमध्ये असेल, ज्यामुळे ते मनोरंजक बनले आहे. या मोसमात गुजरात टायटन्सने चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही.

The race for the ? Four Teams begins today in Chennai ?️

An opportunity to directly make it to the #TATAIPL 2023 #Final ??@gujarat_titans & @ChennaiIPL are all in readiness for the challenge! Who makes it through ?#Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/ykFIVAUi8b

— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023

चेपॉक खेळपट्टीच्या संथ स्वरूपाला सामोरे जाण्याचे आव्हान असेल. याशिवाय पॉवरप्लेमध्ये दीपक चहरची गोलंदाजी आणि डेथ ओव्हर्समध्ये मथिशा पाथिरानाची कामगिरी यांचाही निकालावर लक्षणीय परिणाम होईल. अशा परिस्थितीत पांड्या आणि नेहरा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा सल्ला घेतील कारण त्याला पाथिराना आणि फिरकी गोलंदाज महेश तिक्ष्णाला कसे सामोरे जायचे हे कळेल.

शनाकाचा अष्टपैलू म्हणून वापर केला जाऊ शकतो. पण नाणेफेकीचा विचार करता डावखुरा फिरकीपटू आर साई किशोरचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. जो येथील परिस्थितीशी परिचित आहे. आयर्लंडच्या जोशुआ लिटलचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो.

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांची चांगली सुरुवात चेन्नईसाठी महत्त्वाची ठरेल. चेपॉकमधील अजिंक्य रहाणेच्या कामगिरीलाही महत्त्व आहे, तर शिवम दुबे या मोसमात आतापर्यंतच्या 33 षटकारांची भर घालणार आहे. मात्र, अनुभवी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांना सामोरे जाणे चेन्नईच्या फलंदाजांना सोपे जाणार नाही.

सामन्यासाठी खेळपट्टी सपाट केली तर फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरेल. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मोईन अली आणि तिक्ष्णा हे दर्जेदार फिरकी गोलंदाज असतील तर टायटन्सकडे रशीद आणि नूर अहमद आहेत. अफगाणिस्तानच्या दोन्ही फिरकीपटूंनी या मोसमात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

संभाव्य खेळाडू
चेन्नई सुपर किंग्ज:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार व विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश टेकशाना (राखीव: मथिशा पाथिराना)

गुजरात टायटन्स:
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुदर्शन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल (राखीव: जोशुआ लिटल) /दासुन शनाका))

IPL Play Off Qualifier1 Chennai Gujrat CSK vs GT

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन हजारच्या नोटा आपल्या खात्यात कितीही भरा… असा आहे नियम

Next Post

दोन हजारच्या नोटा : स्टेट बँकेनंतर पंजाब नॅशनल बँकेनेही जारी केले हे नियम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
pnb punjab national bank

दोन हजारच्या नोटा : स्टेट बँकेनंतर पंजाब नॅशनल बँकेनेही जारी केले हे नियम

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011