India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दोन हजारच्या नोटा : स्टेट बँकेनंतर पंजाब नॅशनल बँकेनेही जारी केले हे नियम

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच २ हजार रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने लोकांना २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जुने फॉर्म व्हायरल झाले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये नोटा जमा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, २ हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणताही ओळखपत्र द्यावा लागणार नाही किंवा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. २ हजार रुपयांच्या नोटासुद्धा एकावेळी २० हजार रुपयांपर्यंत सहज बदलता येतात. त्याच वेळी, आता एसबीआयनंतर पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून लोकांमध्ये कोणताही गैरसमज होऊ नये.

२ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वैयक्तिक माहिती मागणारे जुने फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यावर लोकांना सत्य काय आहे हे समजू शकले नाही. कारण कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही, असे आरबीआयच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

आता पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन व्हायरल होणाऱ्या फॉर्मबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बँकेचे म्हणणे आहे की २ हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही आधार कार्ड किंवा अधिकृत सत्यापित दस्तऐवज (OVD) आवश्यक नाही. तसेच, कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. तसेच, कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. या संदर्भात बँकेच्या सर्व शाखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पष्ट केले होते की लोकांना २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. लोक त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन सहज नोटा बदलू शकतात. नोटा जमा करण्यासाठी RBI च्या बँकिंग ठेव नियमांचे पालन केले जाईल. एका दिवसात लोक २ हजार रुपयांच्या १० नोटा म्हणजेच २० हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही. जर तुम्ही बँक खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्हाला पॅन, आधार कार्ड दाखवावे लागेल.

2 Thousand Notes Punjab National Bank PNB Rules


Previous Post

IPL गुजरात आणि चेन्नईत आज टश्शन… कुणाचे पारडे जड? हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज काय?

Next Post

एसटी बस आणि कंटेरनचा भीषण अपघात; ६ ठार, ६ गंभीर जखमी

Next Post

एसटी बस आणि कंटेरनचा भीषण अपघात; ६ ठार, ६ गंभीर जखमी

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group