India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ललित मोदींच्या तब्बल ४ हजार ५५५ कोटींच्या संपत्तीचा मालक ठरला; मोदींनीच केली घोषणा

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना गेल्या दोन आठवड्यात दोन वेळा कोरोना विषाणूच्या संसर्गासह इन्फ्लूएंझा आणि निमोनिया झाला होता. ते आजारी असतानाच कुटुंबात ४,५५५ कोटींच्या संपत्तीवरून वाद सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. अशात ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केले आहे.

व्यावसायिक उद्योग समूह के. के. मोदी फॅमिली ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ललिल मोदी यांनी मुलगा रुचिर मोदी याला तातडीने उत्तराधिकारी घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लंडनमधील रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ललित मोदी यांनी सोशल मीडियावर रुचिर मोदी याला कौटुंबिक बाबींमधील आपला उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मुलगी आलिया हिच्याशी बोलल्यानंतर घेतला असल्याचे ललित मोदी यांनी सांगितले.

कुटुंबातील सदस्यांचे एकमत
ललित मोदी यांनी सांगितले की, याबाबत मुलीसोबत चर्चा केली आहे. तसेच एलकेएम कुटुंबातील कामकाजाचे नियंत्रण आणि ट्रस्टमधील आपल्या हितसंबंधांचं नेतृत्व माझा मुलगा रुचिर मोदीकडे सोपवले पाहिजे, याबाबत आमचे एकमत झाले आहे. ललित मोदींचा त्यांची आई आणि बहिणीसोबत कौटुंबिक संपत्तीच्या मालकीवरून वाद सुरू आहे. ललित मोदींनी या वादाचा उल्लेख प्रलंबित आणि कठीण असा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी अनेक टप्प्यातील विचारविनिमय झाला आहे. मात्र हा वाद संपण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत.

मोदी केवळ विश्वस्त
आयपीएलचे माजी चेअरमन असलेल्या ललित मोदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेक्सिको सिटी येथून लंडन येथे आणण्यात आले आहे. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन दिला जात आहे. रुचिर मोदी यांना कुटुंबाचा उत्तराधिकारी बनवल्यानंतर आता फॅमिली ट्रस्टच्या कुठल्याही संपत्ती किंवा उत्पन्नामध्ये कुठलीही रुची राहणार नाही. मात्र ते केकेएमएफटीचे विश्वस्त म्हणून कायम राहील, असेहील ललित मोदी यांनी स्पष्ट केले.

pic.twitter.com/PUkBX0BgLM

— Lalit Kumar Modi (@LalitKModi) January 15, 2023

IPL Lalit Modi Declare Successor of His Wealth


Previous Post

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांची तडकाफडकी बदली

Next Post

BCCIची लॉटरी! महिला आयपीएलच्या मिडीया अधिकारातून मिळाले तब्बल ९५१ कोटी

Next Post

BCCIची लॉटरी! महिला आयपीएलच्या मिडीया अधिकारातून मिळाले तब्बल ९५१ कोटी

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group