India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांची तडकाफडकी बदली

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी दारूच्या नशेत धावत्या कारमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे केले. घरी गेल्यावर त्या महिलेच्याच बेडरूममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह करीत तिचा पती, दीर, सासूला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी ढुमेंविरोधात विनयभंगासह घरात घुसल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी ढुमे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पीडिता, पती, मुलीसह एका रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेली होती. तिथे ढुमे मित्रांसह आले होते. पीडितेच्या पतीची ढुमेंसोबत ओळख होती. ढमेंनी पीडितेच्या पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. पावणेदोन वाजता सर्व कारने निघाले. पीडिता पुढील सीटवर मुलीसह बसली होती. ढुमे मागच्या सीटवर होते. त्यांनी मागून पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. नंतर ते पीडितेच्या घरी गेले. पीडितेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्याचा आग्रह केला. ढुमेंनी सासू आणि पतीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनाक्रमानंतर पतीने पोलिसांना बोलवले. नागरिकही धावले. पोलिस ढुमेंना घेऊन गेले.

तडकाफडकी बदली
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी ढुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला. निलंबनाचा निर्णय गृह मंत्रालयस्तरावरच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वीही वादात
ढुमे यांचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही ते वादात राहिले आहेत. अहमदनगरला असतानाही ढुमेंनी दारू पिऊन गोंधळ घातला होता. नवरदेवाला वरातीत मारहाण केलेली. इतकेच नाही तर शहरातल्या काही महिला पोलिस कॉन्स्टेबलनीही ढुमेंबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. ढुमे यांची बदली करुन चालणार नाही. थेट निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Women Molestation Aurangabad ACP Vishal Dhume Transfer


Previous Post

डी गँगची नजर आता बॉलिवूडकडून थेट टॉलिवूडवर; तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्या या धक्कादायक बाबी…

Next Post

ललित मोदींच्या तब्बल ४ हजार ५५५ कोटींच्या संपत्तीचा मालक ठरला; मोदींनीच केली घोषणा

Next Post

ललित मोदींच्या तब्बल ४ हजार ५५५ कोटींच्या संपत्तीचा मालक ठरला; मोदींनीच केली घोषणा

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group