मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्सने झंझावाती विजय प्राप्त करून कोलकाता नाईट रायडर्सच्या स्वप्नांवर पाणी टाकलं आहे. यापूर्वीचे सलग दोन सामने जिंकून तळाशी असलेल्या कोलकाताने वर झेप घेतली होती. पण आता त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे चान्सेस जळपास संपुष्टात आले आहेत.
आयपीएल आता अंतिम टप्प्यात आहे. गुजरात आणि चेन्नई आघाडीवर असून त्यांना प्ले-ऑफसाठी स्थान निश्चित करण्याकरिता केवळ एक विजय पुरेसा आहे. इतर संघांमध्ये मात्र कमालीची चुरस बघायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्स कालच्या सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी प्ले-अॉफसाठी आपली जागा जवळपास निश्चित केली असली तरीही त्यांचेही आव्हान अद्याप संपलेले नाही.
कारण मुंबई, लखनौ आणि बंगळुरू यांचे प्रत्येकी तीन सामने शिल्लक आहेत. या तीन संघांनी स्पर्धेतील आपले आव्हान अद्याप टिकवून ठेवलेले आहे. मात्र कोलकाता, पंजाब, हैदराबाद आणि दिल्ली यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे कोलकाताने गुरुवारचा सामना जिंकला असता तर आयपीएलच्या पॉईंट टेबलचे चित्र वेगळे राहिले असते. कारण केकेआर थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असते आणि बंगळुरूसाठी ही मोठी अडचण ठरली असती. आता कोलकाता पुन्हा सातव्या क्रमांकावर जाऊन पोहोचल्याने बंगळुरू आणि लखनौ संघांना दिलासा मिळाल आहे.
सर्व सामने जिंकावे लागणार
आयपीएलच्या पॉईंट टेबलनुसार गुजरात आणि चेन्नई या दोनच संघांचा प्ले-अॉफमधील प्रवेश निश्चित आहे. तर राजस्थान, मुंबई, लखनौ आणि बंगळुरू यांच्यात खरी चुरस आहे. त्यामुळे या संघांना उर्वरित सगळे सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबई, लखनौ आणि बंगळुरू यांचे प्रत्येकी तीन तर राजस्थानचे दोन साखळी सामने शिल्लक आहेत.
IPL 2023 Play Off Calculation Points Table Interesting