India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत छगन भुजबळांच्या दोन्ही नातींना सुवर्ण पदक

India Darpan by India Darpan
February 21, 2023
in स्थानिक बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या दोन्ही मुली कु.देविशा व कु. तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कु.देविशा व कु. तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ३८ देशातील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताचे १२ स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिने १९ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिने १७ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात १ सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे.भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता. या स्पर्धेचे उदघाटन मिडवे केंटच्या महापौर सौ. जेन अल्डोस आणि श्री टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.


Previous Post

मौजमजा करण्यासाठी मोबाईल हिसकावणारे चार जण गजाआड; दुचाकी, २२२ मोबाईल असा ४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

पुढची रणनिती काय? शिवसेना भवनाचा ताबा घेणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं… (Video)

Next Post

पुढची रणनिती काय? शिवसेना भवनाचा ताबा घेणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं... (Video)

ताज्या बातम्या

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group