रतलाम (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशातील रतलाममध्ये दोन तरुणांकडून आठ कोटीचे १३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या आरोपींकडून डॉलर, रियाध आणि दिरहाम ही तीन विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहेत. आठ कोटी रुपयांचे हे सोने घेऊन दोन तरुण रेल्वेने रतलाम येथे येत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी तरुणांना थांबवून सामानाची झडती घेतली असता पेट्यांमध्ये सोन्याच्या विटा आढळून आल्या. आठ कोटी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त झाल्यानंतर रतलाममध्ये खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी ही घटना घडली असून केंद्रीय तपास यंत्रणा, कस्टम विभागाचे अधिकारी आणि महसूल गुप्तचर संचालक तपासासाठी रतलामला पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आयकर आणि जीएसटीला आधीच माहिती दिली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीसांनी केली आहे. या आरोपींकडून डॉलर, रियाध आणि दिरहाम ही तीन विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहेत.
हे सोने घेऊन दोन तरुण रेल्वेने रतलाम येथे येत होते. ८० हून अधिक पेटीत सर्व सोने बिस्किटांच्या स्वरुपात भरण्यात आले होते. पकडलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा राजस्थानचा आहे तर दुसरा आरोपी हा हरियाणाचा आहे. हे दोन्ही आरोपी सध्या रतलाममध्येच राहत असल्याचेही समोर आले आहे. हे सोने कोठून आले याची चौकशी आता सरकारी यंत्रणा करत आहे.
13 kg of gold worth eight crores seized from two youths traveling from Mumbai to Ratlam by train