मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोड: पार्टीसाठी गेलेल्या पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण हत्या

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 10:45 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
पार्टी साठी गेलेल्या पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असले तरी या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह पंचक येथील गोदावरी नदी काठच्या जंगलात आढळून आला.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हा ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रा सोबत पार्टी करण्यासाठी घरून मांसाहारी जेवण बनवून दुचाकीवर गेला होता. मात्र तो पुन्हा घरी आला नाही. कुटुंबियानी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर पत्नी साधना गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

पंचक येथील गोदावरी नदीकाठी भेटला मृतदेह
या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरचा शोध सुरु केला. पण, तो मिळाला नाही. मात्र सोमवारी दुपारी पंचक येथील गोदावरी नदी काठच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील गोदावरी नदी किनारी गेले होते. तेथे त्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यानी गावकऱ्यांच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.

छातीवर खोलवर जखमा
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी याठिकाणी पंचनामा केला. याठिकाणी पुरूषाचा मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे समोर आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले. मृतदेह सात ते आठ दिवसा पासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.

नातेवाईकांनी ओळखले
पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयित तपासासाठी आणले असून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे यांनी बोलून दाखवले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.
The brutal murder of the missing youth of Panchak village who had gone to Nashik Road for a party

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन तरुणांकडून आठ कोटीचे १३ किलो सोने जप्त, विदेशी चलनही मिळाले…..

Next Post

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय… कुलदीपने पाच फलंदाजांना केले बाद

Next Post
F5wwTwUaIAANBai

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय… कुलदीपने पाच फलंदाजांना केले बाद

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011