रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल इतकी हजार प्रकरणे निकाली… एवढ्या कोटींचे तडजोड शुल्क वसूल

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 9:32 pm
in स्थानिक बातम्या
0
lok adalat

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 18 हजार 369 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 181 कोटी 30 लाख 73 हजार 682 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड
▪️आभासी पद्धतीने परदेशात असलेल्या पक्षकारांबरोबर तडजोड
परदेशात असलेल्या एका प्रकरणामध्ये अपघात झाला होता. त्या अपघातामुळे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. पिडित व्यक्ती हि सौदी अरेबिया येथील असल्याने न्यायालयात येणे शक्य नव्हते. लोकअदालत पॅनलप्रमुखांनी या पिडिताला आभासी पद्धतीने (ऑनलाईन) लोकन्यायालयात हजर केले. इन्शुरन्स कंपनी व पिडित व्यक्ती यांच्यात समझोता होवून रूपये 1 लाख 40 हजार रूपये पिडित व्यक्तीला अदा करण्यात आले.

▪️अपघाताने अपंगत्व आलेल्या पक्षकरासाठी लोकन्यायालयाने केली तडजोड
एका मोटार अपघात प्रकरणात पक्षकराला अपंगत्व आले होते. अंपगत्व आलेली व्यक्ती लोकन्यायालय पॅनलवर येवू शकत नसल्यामुळे लोकन्यायालयाने न्यायालयाबाहेर पक्षकाराच्या वाहनापर्यंत जावून तपासणी केली. सदर प्रकरणात इन्शुरन्स कंपनी व पक्षकारामध्ये तडजोड होवून इंन्शुरन्स कंपनीने 37 लाख 50 हजार रक्कम पक्षकारास अदा करण्याचे मान्य केले

▪️मोटार अपघात प्रकरणांमध्ये 293 प्रकरणे निघाली निकाली
मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकूण 2 हजार 36 प्रकरणे ठेवण्यात आले होते. यापैकी 293 प्रकरणे निकाली निघाली. वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनी स्वत: व मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईसाठी प्रकरणे दाखल केली होती. यात तडजोड होवून जखमी व्यक्ती व मृत व्यक्तींच्या वारसांना 293 प्रकरणांमध्ये एकूण 72 कोटी 95 लाख 71 हजार 980 रूपयांची भरपाई मिळाली आहे.

▪️मोटार वाहन चालकांना दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालय येथे एकूण 1 हजार 295 मोटार वाहन प्रकरणांपैकी 305 प्रकरणे लोकन्यायालयात निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.
▪️कौटुंबिक वादविवाद झालेल्या 204 प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात झाली तडजोड
कौटुंबिक वादविवाद असलेल्या 102 प्रकरणांमध्ये तडजोड झाली तर 102 कुटुंबांचे संबंध न्यायालयीन तडजोडीमुळे पुन्हा प्रस्थापित झाले आहे. असे एकूण 204 कुटुंबाचे वैवाहिक जीवन पुर्ववत झाले आहे.

लोकअदालतीत निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 1009 प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- 293 प्रकरणे
▪️कामगार विषयक- 15 प्रकरणे
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 102 प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 436 प्रकरणे
▪️इतर – 1038 प्रकरणे

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख 49 हजार 58 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 15 हजार 476 प्रकरणे निकाली निघाली असून रूपये 9 कोटी 62 लाख 89 हजार 410 रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी दिली आहे.

Nashik Lok Adalat Court Legal Dispute Resolve

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आज खबरदारी बाळगावी… जाणून घ्या, मंगळवार, १२ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

Next Post

दोन तरुणांकडून आठ कोटीचे १३ किलो सोने जप्त, विदेशी चलनही मिळाले…..

Next Post
प्रातिनिधीक फोटो

दोन तरुणांकडून आठ कोटीचे १३ किलो सोने जप्त, विदेशी चलनही मिळाले…..

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011