दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील पहिले BSNL FTTH नॉन भारतनेट तालुक्यातील उमराळे बुद्रुक गावात सुरू झाले आहे. या सेवेचे उदघाटन भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)चे महाप्रबंधक नितीन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
इंटरनेट सेवा खेड्यापाड्यापर्यंत सुरु करण्याचा भारत संचार निगम च्या वतीने उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत सेलिब्रेशन योजना सुरू करण्यात केली आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 609 ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. त्यात पी एम किसान सन्मान योजनेसह सर्व केंद्रशासित योजना या केंद्रामार्फत राबवण्यात येणार आहेत. उमराळे बुद्रुक येथे भारतातील पहिली BSNL FTTH- नॉन भारतनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन नाशिक जिल्हा भारत संचार निगमचे महाप्रबंधक नितीन महाजन यांच्या हस्ते उमराळे बुद्रुक येथील रविराज अपसुंदे यांच्या ई सेवा (सी.एस.सी) केंद्रात नुकतेच करण्यात आले.
महाजन पुढे म्हणाले की भारत संचार निगम इंटरनेट सेवा मध्ये कॉलिंग तसेच टिव्ही चैनल शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. नेटसाठी पाचशे रुपयात कनेक्शन देण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी या आणि इंटरनेट कनेक्शनचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट देण्यात येणार आहे. म्हणूनच शहराकडे न जाता खेड्यांमध्ये उद्योग सुरू झाले तर नक्कीच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन महाजन यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नाशिक जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष पुंडलिक अपसुंदे यांनी केले. यावेळी भारत संचार निगमच्या पी एम आपटेकर, डीजीएम गायकवाड, डीजीएम कुलकर्णी, देवरे, मंडल अभियंता बी एम जाधव, प्रोजेक्ट हेड निलेश कुंभारे,स्वप्नील भालेराव, उमराळे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सुधाकर जगताप जेटीओ गांगुर्डे, एस के पाटील, शशी गामणे,मंडलाधिकारी गायकवाड, तलाठी शिवाजी भोये, देवेंद्र धात्रक, राजू भोये रवींद्र अपसूंदे संतोष सुर्यवंशी सागर कांभीरे गणेश अपसुदे, पालवे, गणपत अपसुंदे गोपीनाथ थेटे आदी उपस्थित होते. उमराळे बुद्रुक गाव व परिसरात सर्व ग्राहकांनी बीएसएनएल ची फायबर इंटरनेट सुविधा फायदा घ्यावा असे ई महासेवा केंद्राचे संचालक योगेश जाधव तसेच रविराज अपसुंदे यांनी केले आहे.