मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील ३ क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, इंडियन नेव्ही अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरने (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाण केले. यावेळी ते किनाऱ्याजवळच अपघातग्रस्त झाले. त्यामुळे या हेलिकॉप्टरला तातडीने समुद्राच्या पाण्यावरच उतरविण्यात आले. शोध आणि बचाव ऑपरेशनमुळे नेव्ही पेट्रोलिंग जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवले. घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात लवकरच अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1633355939133767682?s=20
Indian Navy Helicopter Emergency Landing in Arabian Sea