नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन गट समोरासमोर भिडल्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना विद्या विकास सर्कल भागात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी सात जणांविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत दगड विटांसह लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपाल गायकवाड ,सचिन मोरे, रंजीत जाधव, राकेश गुंजाळ, प्रशांत बोकेफोडे, गौरव उर्फ रॉकी बोरसे व ईश्वर नामक तरूण अशी एकमेकांमध्ये हाणामारी करणा-या संशयितांची नावे आहेत. या घटनेत प्रशात अशोक बोकेफोडे (२९ रा.मोहिनी अपा.पाईप लाईनरोड,गणेशनगर) व जयपाल संजय गायकवाड (२४ रा.मधुबन सोसा.केबीटी सर्कल जवळ गंगापूररोड) हे दोन तरूण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पोलिस अंमलदार गोरख साळुंके यांनी फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विद्या विकास सर्कल येथील अवंती नाश्ता दुकानासमोर अज्ञात कारणातून दोन गट समोरासमोर भिडल्याने ही हाणामारी झाली. यात दगड विटांसह काही तरी प्राणघातक हत्याराचा वापर करण्यात आल्याने दोघे तरूण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सोळंके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten