नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोड भागात महिले समवेत झालेल्या वादातून दांम्पत्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने ३० वर्षीय युवक जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू मारूती पवार व दुर्गा राजू पवार (रा.दोघे चैतन्य बेकरी जवळ नवनाथनगर पेठरोड) असे तरूणास मारहाण करणाºया पतीपत्नीचे नाव आहे. याबाबत सुनिल नागू गायकवाड (रा.सिध्दार्थनगर झोपडपट्टी,कॅनडा कॉर्नर गंगापूररोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
गायकवाड मंगळवारी (दि.३१) सायंकाळी नवनाथनगर भागात गेला असता ही घटना घडली. पवार दांम्पत्याने त्यास एका महिलेबरोबर झालेल्या वादाचा जाब विचारत त्यास बेदम मारहाण केली. यावेळी धारदार वस्तूने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
दोन लॅपटॉपसह मोबाईल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात घरात शिरून दोन लॅपटॉपसह मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार घडला. या घटनेत ३० हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक चंद्रप्रकाश देशमुख (२१ रा. रामगंगा रो हाऊस, संत सावतामाळी नगर फायर ब्रिगेड आॅफिस मागे,अमृतधाम) या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख मंगळवारी (दि.३१) आपल्या घरात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जींगला लावलेला मोबाईल व दोन लॅपटॉप असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten