गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९ राज्यांमधील चित्रपट निर्माते आणि कलाकार….महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिभावंताचा समावेश

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2023 | 1:42 pm
in राष्ट्रीय
0
Untitled 65

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) काही दिवसातच सुरू होणार आहे आणि या महोत्सवाचा एक भाग असलेल्या ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ या उपक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यासाठी देशभरातून गुणवत्तावान चित्रपट निर्माते आणि कलाकारांची अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे.

निवड करणारे परीक्षक आणि महापरीक्षक पॅनेलकडून निवड झालेल्यांची बहुप्रतिक्षित यादी जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये उद्याचे प्रतिभावान असलेले हे उदयोन्मुख सहभागी भारतामधील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. या प्रतिभावंतांमध्ये महाराष्ट्रातील निर्माते, कलाकारांची संख्या सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि तामिळनाडूमधील प्रतिभावंत आहेत.

यंदाच्या आवृत्तीविषयी बोलताना केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, या वर्षी पुन्हा एकदा आपल्याकडे ‘ उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ म्हणून देशभरातील ७५ प्रतिभावंत आहेत”. चित्रपटनिर्मिती स्पर्धेचा भाग म्हणून अतिशय उत्तम लघुपटांची निर्मिती होण्याची आम्ही अपेक्षा करत आहोत, असे त्यांनी सांगितले. निवड झालेल्या सर्वच विजेत्यांना विशेष प्रकारे नियोजन केलेल्या ‘मास्टरक्लासेस’ आणि सत्रांमधून ज्ञान मिळेल आणि गुणवत्ता शिबिरांच्या माध्यमातून त्यांना भावी काळात फायदेशीर ठरणारे गुणवंतांचे परिचय होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, जगातील सर्वोत्तम आशयसमृद्ध उपखंड बनण्याच्या भारताच्या वाटचालीमध्ये हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा असेल”.

यावर्षी देशाच्या अतिदूरवर असलेल्या अंतर्गत भागातूनही स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्यामध्ये बिष्णुपूर(मणिपूर), जगतसिंगपूर(ओदिशा) आणि सदरपूर(मध्य प्रदेश) येथून आलेल्यांचा समावेश आहे.निवड झालेल्या विजेत्यांची चित्रपटविषयक क्षेत्र आणि राज्य यांनुसारची यादी इफ्फीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चित्रपटनिर्मितीमधील खालील कौशल्यांमध्ये आलेल्या ६०० पेक्षा जास्त अर्जदारांच्या समूहामधून गुणवत्तेच्या आधारावर ७५ सहभागींची निवड करण्यात आली आहे-

दिग्दर्शन,पटकथा लेखन,सिनेमाटोग्राफी, अभिनय, संकलन, पार्श्वगायन, संगीतकार, पोशाख आणि रुपसज्जा, कला रचना आणि ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स(VFX), ऑगमेंटेड रियालिटी(AR) आणि व्हर्चुअल रियालिटी(VR). दिग्दर्शन क्षेत्रातील १८, ऍनिमेशन, व्हीएफएक्स, एआर आणि व्हीआर क्षेत्रामधील १३ आणि छायालेखन(सिनेमॅटोग्राफी) क्षेत्रातील १० कलावंतांचा यामध्ये समावेश आहे.

विशेष म्हणजे अॅनिमेशन, दृश्य परिणाम (व्हीएफएक्स), वर्धित वास्तव (एआर) आणि आभासी वास्तव (व्हीआर) श्रेणीतून सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत .हे भारताच्या एव्हीजीसी -एक्सआर क्षेत्राला गती देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांच्या सुसंगत आहे.
सर्व सहभागी ३५ वर्षाखालील असून संगीत रचना /साउंड डिझाईन श्रेणीतील सर्वात तरुण सहभागी महाराष्ट्रामधील मुंबई इथला शाश्वत शुक्ला १८ वर्षांचा आहे. या आवृत्तीतील ७५ सर्जनशील कलाकार इफ्फीच्या आगामी आवृत्तीत खालील उपक्रमांना उपस्थित राहतील: यावर्षी, ७५ सर्जनशील कलाकारांसाठी खास रचना केलेले तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणारे मास्टरक्लास आयोजित केले जातील.

दिग्दर्शनासंदर्भातील मास्टरक्लासमध्ये उमेश शुक्ला ओ माय गॉड चित्रपटासाठी केलेले पटकथा लेखन आणि दिग्दर्शनासंदर्भात वस्तुनिष्ठ अध्ययन (केस स्टडी ) सादर करतील. दूरचित्रवाणी, ओटीटी आणि चित्रपटांसाठी व्यापक काम केलेले ज्येष्ठ पटकथा लेखक चारुदत्त आचार्य हे पारंपरिक मंचापासून नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करतील. अॅनिमेशनवरील मास्टरक्लासमध्ये, पुरस्कार विजेत्या निर्मात्या, चारुवी डिझाईन लॅब्सच्या चारुवी अग्रवाल या अॅनिमेशन आणि दृश्य परिणामांचा वापर करून भारताच्या कथा सांगण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना मांडतील. या व्यतिरिक्त, एनएफडीसीने बर्लिनेल टॅलेंट्स कार्यक्रम व्यवस्थापक फ्लोरिअन वेघॉर्न यांच्यासोबत आभासी माध्यमातून मास्टरक्लासचे आयोजन केले आहे, ते फिल्म फेस्टिव्हल ॲज अ लॉन्च पॅड फॉर न्यू टॅलेंट ” म्हणजेच “नवीन प्रतिभेसाठी सुरुवात म्हणून चित्रपट महोत्सव” च्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन करतील.

सहभागींना त्यांच्या चित्रपटांना वित्तपुरवठा करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील सत्रात उपस्थित राहण्याची संधी देखील मिळेल.त्यांना सत्रां दरम्यान माहिती मिळवण्याची आणि क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. सहभागीना ४८ तासात चित्रपट तयार करण्याचे आव्हानचा एक भाग म्हणून लघुपट तयार करण्यासाठी गट स्पर्धेत भाग घेतील या माध्यमातून सहभागींना त्यांचे कलागुण प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, सहभागी त्यांच्या चित्रपटांद्वारे,४८ तासांमध्ये “मिशन लाईफ ” अभियाना बद्दल त्यांनी लावेलला अर्थ प्रदर्शित करतील. या स्पर्धेची संकल्पना एनएफडीसीने लघुपटांना समर्पित जगभरातील जाळे असलेल्या शॉर्ट्स इंटरनॅशनल या यूके स्थित कंपनीच्या सहकार्यातून मांडली आहे. शॉर्ट्स टीव्ही कडे दूरचित्रवाणी संचावर , मोबाइलवर, ऑनलाइन आणि चित्रपट गृहामध्ये उपलब्ध असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या लघुपट आणि मालिकांची जगातील सर्वात मोठी सूची आहे आणि प्रसारक आणि ब्रँडसाठी मूळ लघुपट आशयदेखील देखील तयार केला जातो.

फिल्म बाजारचा एक मार्गदर्शित दौरा सहभागींना चित्रपट व्यवसायाचा साक्षीदार होण्याची संधी प्रदान करेल. या महोत्सवाची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘फिल्म बाजारचे’ – सह उत्पादन बाजार, लॅबमध्ये प्रगतीपथावर असलेल्या प्रक्रिया, अवलोकन कक्ष, पटकथा लेखकांचा प्रयोगकक्ष, मार्केट स्क्रीनिंग , निर्मात्यांची कार्यशाळा, ज्ञान मालिका, बुक टू बॉक्स ऑफिस असे विविध घटक आहेत.या वर्षीच्या ‘बुक टू बॉक्स ऑफिस’ भागामध्ये सर्जनशील लेखकांना त्यांची प्रतिभा सादर करण्यासाठी आणि त्यांच्या कथांची निर्मात्यांना ओळख करून देण्यासाठी एक भागीदार म्हणून ‘द स्टोरी इंक’ हा उपक्रम असेल.

सहभागींना भारतातील प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या यांच्यासह प्रोडक्शन हाऊस, AVGC कंपन्या आणि स्टुडिओच्या प्रतिनिधींसोबत संपर्क प्रस्थापित करता यावा यासाठी एक क्रिएटिव्ह माईंडस् ऑफ टूमारो टॅलेंट कॅम्प आयोजित केला जात आहे. सहभागी त्यांच्या कल्पना, संकल्पना, कौशल्य, यापूर्वी केलेले काम यांच्या आधारावर उद्योगातील नावाजलेल्या व्यक्तीबरोबर किंवा संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.

या आवृत्तीसाठी ७५ सहभागींची निवड ज्युरी पॅनेलद्वारे करण्यात आली होती ज्यात खालील दिग्गजांचा समावेश होता-
महापरीक्षक (ग्रँड ज्युरी)-
श्रेया घोषाल (पार्श्वगायन)
श्रीकर प्रसाद (संकलन )
मनोज जोशी (अभिनय)
वीरा कपूर (वेशभूषा आणि रंगभूषा)
प्रिया सेठ (सिनेमॅटोग्राफी)
सरस्वती वाणी बालगम (ॲनिमेशन, व्हईएफएक्स, AR-VR)
सलील कुलकर्णी (संगीत रचना)
उमेश शुक्ला (दिग्दर्शन)
साबू सिरिल (कला दिग्दर्शन)
असीम अरोरा (पटकथालेखन)

निवड परीक्षक –
मनोज सिंग टायगर (अभिनय)
निधी हेगडे (अभिनय)
अभिषेक जैन (दिग्दर्शन)
मनीष शर्मा (दिग्दर्शन)
चारुदत्त आचार्य (पटकथालेखन)
दीपक किंग्राणी (पटकथालेखन)
चारुवी अग्रवाल (ॲनिमेशन, व्हीएफएक्स, AR-VR)
दीपक सिंग (ॲनिमेशन, , व्हीएफएक्स, AR-VR)
नवीन नूली (संकलन )
सुरेश पै (संकलन )
धरम गुलाटी (सिनेमॅटोग्राफी)
सुभ्रांशु दास (सिनेमॅटोग्राफी)
नचिकेत बर्वे (वेशभूषा आणि रंगभूषा)
बिशाख ज्योती (पार्श्वगायन)
अनमोल भावे (संगीत रचना)
सब्यसाची बोस (कला दिग्दर्शन)

७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो”
हा एक अभिनव उपक्रम असून तो केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. संपूर्ण भारतातील चित्रपट प्रतिभावंतांच्या कलागुणांना ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागींना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिली जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी इफ्फीच्या २०२१ च्या आवृत्तीत हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय रेल्वेला या मोहिमेतून मिळाले तब्बल २२४ कोटी ९५ लाख रुपये…इतकी जागाही झाली मोकळी…

Next Post

वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट….राजकीय चर्चेला उधाण

India Darpan

Next Post
Untitled 66

वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट….राजकीय चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011