इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय रेल्वेने विशेष मोहीम ३ अंतर्गत रेल्वेच्या कार्यालयांमध्ये विविध स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. .वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सर्व कर्मचारी कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले होते. सर्व नोडल अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अथक परिश्रमामुळेच रेल्वेने अनेक बाबींमध्ये जवळपास १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
या मोहिमे दरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक उपक्रम, प्रशिक्षण संस्था, रेल्वे कार्यशाळा आणि स्थानकांमध्ये२३,६७२ स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी भंगाराची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले यामुळे ११.८० लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आणि २२४.९५ कोटी रुपये (अंदाजे) महसूल प्राप्त झाला.
याशिवाय या मोहिमेदरम्यान २.८ लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने १.७० लाखांहून अधिक नस्तींचा आढावा घेण्यात आला आणि त्यातील एक लाखांहून अधिक नस्तींची नोंद करण्यात आल्या. आपले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी तसेच कर्मचारी आणि सामान्य जनतेला स्वच्छता मोहिमेसाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने, रेल्वे समाजमाध्यमे (ट्विटर, फेसबुक इ.) आणि इतर मंचांचा सक्रियपणे वापर करत आहे. या मोहिमेदरम्यान रेल्वेच्या विविधहॅण्डल्स वरून ६९०० हून अधिक पोस्ट समाजमाध्यमांवर करण्यात आल्या होत्या आणि ११४ प्रसिद्धिपत्रके रेल्वेने प्रसिद्ध केली.