नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षाप्रवासात महिलेच्या गळयातील सोन्याची पोत सहप्रवासी असलेल्या भामट्यांनी हातोहात लांबविली. ही घटना महामार्गावरील बळी मंदिर चौक परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकीता संकेत आहेर (रा.हनुमानवाडी,आडगाव शिवार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर या सोमवारी (दि.५) सकाळी रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अॅटोरिक्षात बसलेल्या चार महिलांपैकी कुणी तरी त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. ही घटना बळी मंदिर चौकातील पेशवा हॉटेल भागात महिला उतरून गेल्यानंतर निदर्शनास आली. अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.