इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसेला रामराम करुन वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते लवकरच शिवसेनेत येणार असून ९ जुलै ही तारीखही ठरली. मोरे यांचा शिवसेना प्रवेशाला खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ते सामजिक कार्यकर्ते आहेत. एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचे पुण्यात सामाजिक आणि राजकीय कार्य चांगले आहे. ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.
मनसेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. पण, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी वंचितकडून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला.