नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर व परिसरात झालेल्या वेगवेगळया अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यात पादचा-याचा दुचाकीच्या धडकेत तर महिलेचा बसने धडक दिल्याने मृत्यू झाला असून याप्रकरणी मुंबईनाका व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर गंगाधर नेगे (रा.हरि संकुल अपा.अशोकामार्ग ) हे गेल्या ५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास परिसरातील दुकानात खरेदीसाठी जात असतांना हा अपघात झाला होता. अशोका मार्गावरील वेलनेस मेडिकल स्टोअर्स समोरून ते रस्त्याने पायी जात असतांना भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली होती. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी दुखापत झाल्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.३०) उपचार सुरू असतांना डॉ. राजेंद्र आहेर यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
दुसरा अपघात शिंदेगावात झाला. रत्नाबाई भास्कर जाधव (६२ रा.जाधव मळा,मतेवाडीरोड शिंदे ता.जि.नाशिक) यांचा या अपघातात मृत्यू झाला. रत्नाबाई जाधव या सिन्नर येथे गेल्या होत्या. रविवारी (दि.३०) त्या खासगी वाहनाने येवून शिंदे गावातील ब्रिजवर उतरल्या असता हा अपघात झाला. ज्ञानेश्वर मते यांच्या घरासमोर त्या ब्रिजवरून खाली पायी उतरत असतांना सर्व्हीस रोडने भरधाव येणाºया एमएच २० बीआय ०८९० या एसटीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखणी झाल्याने मुलगा धनाजी जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.