इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी आघाडी मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अनिल परब यांना आतापर्यंत ४४, ७९१ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना १८,७७१ मते मिळाली असून परब यांनी यात आघाडी घेतली आहे. निरंजन डावखरे यांना तब्बल ५८ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना केवळ १८ हजार मते मिळाली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. तर नाशिक मतदार संघात शिवसेवा शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी आघाडी घेतली आहे.पहिल्या फेरीत किशोर दराडे – १११४५ यांना, विवेक कोल्हे – ९३७०, संदीप गुळवे – ७०८८ मते मिळाली आहे. अद्याप मतमोजणीचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाही. पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले असून त्याची मोजणी ३० टेबलवर होत आहे.